चिमूर नगर परिषद पाणी पुरवठा योजना होणार सुरू

0
425

चिमूर नगर परिषद पाणी पुरवठा योजना होणार सुरू

वित्त मंत्रालयाची मंजुरी ; आम. किर्तीकुमार भांगडीयांच्या प्रयत्नांना यश

चिमूर (आशिष गजभिये) : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोतथान महाअभियान मधून टंचाई ग्रस्त क्षेत्र चिमूर जिल्हा चंद्रपूर नगर परिषद पाणी पुरवठा योजना कंत्राट प्रकिया पूर्ण झाली असताना वित्त विभागाने स्थगिती दिली असता आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांचेशी पत्रव्यवहार केला तेव्हा अर्थमंत्री अजित पवार यांनी पाणी पुरवठा योजनेस मान्यता दिली असून आमदार भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

चिमूर नगर परिषद अंतर्गत क्षेत्रात पाणी पुरवठा गंभीर समस्या असताना शहर पाणी पुरवठा योजना प्रकल्पास राज्य शासनाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरातथोतन महाअभियान मंजुरी दिल्या नंतर निविदा व कंत्राटदार निश्चिती सह प्रकिया पूर्ण झाली आहे.

शासन निर्णयानव्ये दि २८ मार्च २०१८ रोजी सदर चिमूर पाणी पुरवठा योजनेस महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरातथान महा अभियान अंतर्गत अंदाजे ५१.५० कोटी रुपये योजनेस मंजुरी देण्यात आली आहे परंतु शासनाच्या वित्त विभागाने २४/७ पाणी पुरवठा योजनेस स्थगिती दिल्याने कंत्राटदारास काम सुरू करण्यास विलंब होत आहे त्यामुळे जनमानसांत अनिश्चितेचे वातावरण निर्माण झालेले आहे.

आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी जनतेच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या सतत दखल घेत वारंवार शासनाशी संपर्क करीत असताना अर्थमंत्री नामदार अजित पवार यांचेशी पत्रव्यवहार केला.

अर्थमंत्री अजित पवार यांनी सुद्धा दखल चिमूर च्या पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी मान्यता देण्याचे संबंधितांना आदेश दिले गेल्याने अखेर आमदार भांगडीया यांच्या प्रयत्नाला यश येत आहे तेव्हा चिमूरकर जनतेची पाणी समस्या येत्या काही काळात सुटणार असल्याने नागरिकांत आमदार किर्तीकुमार भांगडीया विषयी समाधान व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here