घुग्घुस भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघातर्फे जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा

0
384

घुग्घुस भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघातर्फे जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा

दि.२८ जुलै २०२२ गुरुवार रोजी भारतीय लाॅयड्स मेटल्स कामगार संघ घुग्घुस अध्यक्ष प्रदीपकुमार वाजपेयी यांच्या सुचनेनुसार आज भा.ला.मे.का.संघ महामंत्री हिवराज बागडे आपले मनोगत व्यक्त करण्यात आले.अध्यक्ष प्रदीपकुमार यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून जागतिक निसर्ग संवर्धन दिन: दरवर्षी 28 जुलै रोजी जगभरात जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा केला जातो. नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याच्या सर्वोत्तम प्रयत्नांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक संरक्षण दिन साजरा केला जातो. पृथ्वी आपल्याला मर्यादित प्रमाणात गोष्टी पुरवते ज्यावर आपण सर्व पूर्णपणे अवलंबून असतो जसे की पाणी, हवा, माती आणि झाडे आणि वनस्पती.

 

पर्यावरणाच्या रक्षणासाठी कोणती पावले उचलली आहेत…

सौर आणि पवन ऊर्जेसारख्या पर्यायी ऊर्जेचा वापर. परिसंस्थेची देखभाल करण्यासाठी आणि मातीची धूप रोखण्यासाठी अधिकाधिक झाडे लावा. पाण्याच्या स्त्रोतांचा योग्य वापर करा आणि बागांना पाणी देण्यासाठी स्वयंपाकघरातील पाण्याचा पुनर्वापर करा. पाणलोट क्षेत्रात वनस्पती वाढवा. विजेचा वापर कमी करा. पुनर्वापर करण्यायोग्य आणि बायोडिग्रेडेबल उत्पादने वापरा. कचऱ्याच्या पुनर्वापराची खात्री करा. कमी अंतरासाठी कारचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा. प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशव्या किंवा कापडी पिशव्या वापरा. सेंद्रिय कंपोस्ट वापरून स्वतःच्या भाज्या पिकवा. जलशुद्धीकरण केंद्रे आणि पावसाचे पाणी साठवणे.असे सांगितले. यांचे मनोगत आभार भा.ला.मे.का. संघ घुग्घुस कार्याध्यक्ष समीर शील यांनी केले.

यावेळी प्रमुख पाहूणे लाॅयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीचे प्रमुख संजय कुमार,एच.आर.विभागाचे प्रमुख प्रशांत पुरी,उत्पादन विभाग प्रमुख गुणाकार शर्मा, भारतीय मजदूर संघ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रमोद येलचलवार, सहसंघटन मंत्री प्रशांत कौराशे व भा.ला.मे.का.संघाचे भास्कर कुचनकर, सुधीर बावणे,विजय माथनकर,वासुदेव मडावी कार्यकारिणीत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here