रस्त्याची दुरावस्था, ग्रामपंचायत अनभिज्ञ

0
622

रस्त्याची दुरावस्था, ग्रामपंचायत अनभिज्ञ

 

ग्रा.पं बामनवाडा येथील वॉर्ड न. 1 मध्ये येत असलेले अंगद नगर येथे दोन-दोन वॉर्ड मेंबर असून सुद्धा इथल्या वॉर्डातील रस्त्या ची अवस्था खूप बिकट आहे.

पावसाळ्या मध्ये ये-जा करण्यास नागरिकांना खूप नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. कित्येकदा दुचाकी स्लीप होऊन पडलेले आहे. या वॉर्डात नर्सिंग कॉलेज, आय.टी.आय, कॉन्व्हे्ट सुद्धा आहे. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा पाऊसा मध्ये ये जा करण्यास खूप त्रास होतो. तसेच इथल्या वॉर्ड सदस्यांनी आज पर्यंत स्वतःचा चेहरा सुद्धा दाखवला नाही आहे. निडणुकांपूर्वी यांचे चेहरे दिसतात मग निवडणुक येत पर्यंत पुन्हा दिसत नाही.

ग्रामपंचायत मध्ये स्ट्रीट लाईट साठी निवेदन देऊन 8 महिने लोटून गेले तरी पण आता पर्यंत सुद्धा ते लागले नाही. त्या वर काही अँक्शन पण घेतली नाही. लवकरात लवकर रस्ते आणि स्ट्रीट लाईट लावून देण्याचे करावे अन्यथा ग्रामपंचायत समोर आंदोलन केले जाणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राजुरा शहर कार्याध्यक्ष संदिप पोगला यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here