गोवरी कॉलनी येथील युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू

0
374

गोवरी कॉलनी येथील युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू

 

राजुरा
शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास गोवरी कॉलनी येथील एका युवकाची दुचाकी क्र. MH 34 BK 8442 आणि कपडे गोवरी जवळील नाल्याजवळ आढळून आले. प्रीतम गुरुदास आवारी वय 24 वर्षे रा. गोवरी कॉलनी असे युवकाचे नाव असून हा युवक पोहायला आला होता. या बाबतची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी एपीआई साखरे व अन्य पोलीस कर्मचारी दाखल झाले पोलिसांनी प्रीतमचा शोध घेतला मात्र नाल्यात तुडुंब पाणी असल्यामुळे त्याचा शोध लावण्यात अडथळा होत होता. आज पहाटे नाल्यातून पूर ओसरल्यानंतर त्याचा मृतदेहच आढळून आला. मृतकाच्या मागे आई-वडील व तीन बहिणी मोठा आपतपरिवार आहे. प्रीतम आवारी यांचे वडील वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात चालक म्हणून कार्यरत आहेत. आई नुकतीच तीर्थयात्रेला गेली असल्याने हा तरुण आपल्या लहान बहीण आणि वडिलांसोबत घरी होता. पण 16 जुलै रोजी दुपारी 3.45 वाजताच्या सुमारास प्रीतम मोटारसायकलवरून नाल्याकडे गेला तो परतच नाही आला. समोरील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या मार्गदर्शनात एपीआई साखरे व पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here