उपरवाही येथे भीम आर्मी (भारत एकता मिशन) शाखा गठीत

0
389

उपरवाही येथे भीम आर्मी (भारत एकता मिशन) शाखा गठीत

 

 

कोरपना : गाव तिथे शाखा अभियाना अंतर्गत आज दिनांक 06/07/2022 रोजी जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांच्या मार्गदर्शनात व उप जिल्हाप्रमुख सुरज उपरे यांच्या नैतृत्वात उपारवाही या दुर्गम भागात भीम आर्मीची शाखा गठीत करण्यात आली.

त्यात सर्वानुमते शाखा प्रमुख म्हणून रामदास रामटेके, उपशाखा प्रमुख गौतम गोंडणे, महासचिव प्रमोद झाडे, सचिव आकाश मोहुर्ले, सहसचिव मारोती झोडे,मीडिया प्रमुख अंजु ताकसांडे, प्रवक्ता संगीता झोडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर मुन्ना मेश्राम, चंदू देठे, शुभम झाडे, निखिल दुर्गे, नामदेव चुनारकर, अनिल चिलमुले, लक्ष्मण रामटेके, मनोज मेश्राम, मायाबाई झोडे यांची शाखा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

नुकत्याच विश्राम गृह चंद्रपूर इथे आढावा बैठकीनंतर जिल्ह्यातील प्रत्येक सैनिक हा सज्ज झालेला आहे. जोमाने कार्य करण्यास त्यात प्रथम बाजी जिल्हा उप प्रमुख सुरज उपरे यांनी मारली आणि गाव तिथे शाखा अभियानास सुरवात केली असे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे यांनी सुरज उपरे यांचे तोंडभरून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here