चंद्रपूरात अवैध रेतीचे वाहन जप्त !

0
332

चंद्रपूरात अवैध रेतीचे वाहन जप्त !

महसूल विभागाच्या पथकाची कारवाई ! रेती माफियांत उडाली खळबळ !

🌀🟥चंद्रपूर🛑🟩 🟨🔶किरण घाटे💠🟨चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध रेती वाहतुकीवर अंकुश तथा अवैध रेती वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यांसाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जातीने लक्ष पुरविले असल्याचे एकंदरीत दिसून येते .🟨🟡💠🌀🟣दरम्यान चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी राेहन घुगे व तहसीलदार निलेश गाैंड यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार जितेन्द्र गादेवार व त्यांचे महसुल पथकाने नुकतेच चंद्रपूरातील रामनगर येथे रेतीचे एक वाहन पकडल्याचे व्रूत्त आहे .या बाबत असे कळते की बाबुपेठ येथील रहिवाशी पंचम रामजी भाेयर हा एम एच ३४एम ५३१२या (हाँफटन)वाहनाने विना परवाना व विना राँयल्टी रेती नेत हाेता .🟣☀️🟢💠गुप्त माहितीच्या आधारे ते वाहन स्थानिक महसुल विभागाच्या एका पथकाने पकडले .सदरहु वाहनातील अवैध रेतीचा जप्तीनामा करुन ते वाहन दंडात्मक कारवाईसाठी तहसिल कार्यालयात जमा करण्यांत आले आहे .🔶🟨🛑उपरोक्त वाहन गणपती वार्डातील प्रशांत तपासे यांचे मालकीचे असल्याचे बाेलल्या जाते .सध्या जिल्ह्यात अवैध रेती साठे व अवैध रेती वाहने पकडण्यांची माेहिम जाेरात सुरु आहे ! हे मात्र तितकेच खरे आहे .

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here