मारोती कनिष्ठ महाविद्यालयाचा 💯 टक्के निकाल

0
619

मारोती कनिष्ठ महाविद्यालयाचा 💯 टक्के निकाल

 

 

कोठारी :- राज जुनघरे
नुकताच घोषित झालेला उच्च माध्यमिक 12 वी परिक्षेचा निकाल लागलेला असून यात कोठारी येथील मारोती कनिष्ठ महाविद्यालयाचा यशस्वी पणे शंभर टक्के निकाल लागलेला आहे. यात महाविद्यालयाचा रुतिक घुगुसकर हा विद्यार्थी 84.17 टक्के गुण घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याचा मान मिळविलेला आहे. याच महाविद्यालयातिल वेदांती गौरकर ह्या विद्यार्थ्यांनीने 80.81 टक्के वारी गाठत द्वितीय क्रमांक पटकाविला तर समृद्ध लोखंडे याने 79.50 टक्के गुण मिळवून तिसरा व श्रिल्क्षमी अकार हीने 79.17 टक्के गुण मिळवून चौथी आली. हि सर्व विद्यार्थी विज्ञान शाखेतील असुन संपूर्ण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते सह मारोती कनिष्ठ महाविद्यालयाचा यशस्वी शंभर टक्के निकाल लागलेला आहे. सर्व गुनवंत विद्यार्थी सह बारावीच्या निकालात प्राविण्य मिळविलेल्या सर्व विद्यार्थी वर्गाचे महाविद्यालयाचे संचालक आशुतोष चटप, किशोर देवाळकर, डॉ. विजय मसराम, मुख्याध्यापक जि. एस. कडेल व सहाय्यक शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here