घनसावंगीत आम आदमी पार्टी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार – सुनील देशमुख

0
436

घनसावंगीत आम आदमी पार्टी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार – सुनील देशमुख

 

 

आज आम आम आदमी पार्टी तर्फे तालुका घनसावंगी आढावा बैठक निमित्त जिल्हाध्यक्ष संजय हिवाळे सुग्रीवजी मुंडे अनिल ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम आदमी पार्टी ची बैठक झाली. या बैठकीत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. तालुक्यामध्ये स्वच्छ चेहरा स्वच्छ राजकारण व तालुक्याला भ्रष्टाचारमुक्त लोकप्रतिनिधी देण्याची भावना व्यक्त केली. यामध्ये अनेक गावांमधून कार्यकर्ते निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यासंदर्भात मीटिंगमध्ये या विषयावर चर्चा झाली, असे आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष सुनील देशमुख व सचिव सचिन खोजे, ज्ञानेश्वर नाईकवाडी, योगेश कोल्हे, अफसर शेख, संतोष मुळे, नितीन अंधारे, सोनू मुळे, इसाक भाई, अलीम भाई असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी नियुक्ती पत्रक, गावपातळीवर शाखाध्यक्ष नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here