सेवानिवृत्त जवानाचे विहीरगांवात जंगी स्वागत

0
702

सेवानिवृत्त जवानाचे विहीरगांवात जंगी स्वागत

 

 

विहीरगाव : लष्करातून निवृत्त होऊन गावी परतलेल्या बहुतांश सैनिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. राजुरा तालुक्यातील विहीरगांव येथे मात्र निवृत्त होऊन गावांत आलेल्या जवानाचे त्यांच्या कर्तव्याला व शौर्याला सलाम करण्यासाठी जंगी स्वागत करण्यात आले. तिरंगा देऊन त्यांची गावातून मिरवणूकही काढण्यात आली.विहीरगांव येथील जवान मारोती साळवे व गजानन बोबडे यांनी हा अनोखा अनुभव आला.

 

लष्करातील सेवा पूर्ण करून ते गावांत परतले. गावांच्या या सुपुत्राचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. गावांपासून दूर राहून लष्करात २६ वर्षे सेवा केलेल्या मारोती साळवे व २२ वर्षे सेवा केलेले गजानन बोबडे यांची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. या स्वागताने मारोती साळवे व गजानन बोबडे हेही भारावून गेले. ‘मातृभूमीची सेवा करून परतलो आहे. नोकरीची सेवापूर्ती झाली असली तरी देशसेवा अंतिम श्‍वासापर्यंत सुरूच राहील’ अशी प्रतिक्रिया मारोती साळवे आणि गजानन बोबडे यांनी व्यक्त केली. समस्त ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. तुमचे देशासाठी असलेले समर्पण खरोखर प्रशंसनीय होते. आम्ही आशा करतो की निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात आनंद आणि मिठीत सुख समृद्धी कायम राहो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here