त्या समाजकंटकांचा शोध कधी लागणार

0
548

त्या समाजकंटकांचा शोध कधी लागणार

पोलीस प्रशासनाकडून आंबेडकरी जनतेला न्यायाची प्रतीक्षा

 

 

कोरपना : आवाळपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती डॉ. आंबेडकर नगर मधील वाचनालय परिसरात पूर्णाकृती पुतळ्याच्या जवळ मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. यावेळी परिसराला सुशोभित करत लाईट सिरीज झेंडे लावून सजविलेल्या गेले. संपूर्ण गावात भीमसैनिकांनी भीम रॅली काढली व मोठ्या धुमधडाक्यात जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला. जयंतीचा कार्यक्रम पूर्णपणे शांततेत पार पाडल्यानंतर काही समाजकंटकांनी वाचनालय पूर्णाकृती पुतळ्याजवळ लावलेले लाईट व सिरीज व झेंडे काही समाजकंटकांनी रात्रीच्या वेळेला तोडून टाकले. दुसऱ्या दिवशी ही घटना समाजबांधवांच्या लक्षात येताच सर्व भीमसैनिकांनी नाराजगी व्यक्त करत पोलीस स्टेशन गडचांदूर ला संशयित व्यक्तीच्या विरुद्ध तक्रार दिल्ली. पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगाराला पकडून कायदेशीर शिक्षा करू असे आश्वासन दिल्यामुळे आंबेडकर वादी जनतेने आपले आंदोलन काही काळापर्यंत स्थगित केले परंतु आठ दिवसाचा कालावधी लोटूनही पोलीस प्रशासनाने काहीच कारवाई न केल्याने जनतेमध्ये असंतोष पसरला आहे. समाज विघ्नसंतोषी कार्य करणाऱ्या गुन्हेगाराला पोलीस शोधतील काय असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून करावे संबंधित गुन्हेगाराला पकडून तात्काळ समाजाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी गावातील नागरिक व संथागार डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध मंडळ आवाळपूर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here