भिम आर्मी बल्लारपूर तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील मुख्य विज लाईन भुमिगत करण्याचे मुख्याधिकारी यांना निवेदन

0
244

भिम आर्मी बल्लारपूर तर्फे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोरील मुख्य विज लाईन भुमिगत करण्याचे मुख्याधिकारी यांना निवेदन

बल्लारपूर/रोहन कळसकर : नगर परिषद बल्लारपूर च्या मुख्य चौकात असलेल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वराज्याचे रक्षण करणारे स्वराज्य रक्षक व संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोरील अनेक वर्षांपासून असलेले मुख्य विज पुरवठ्याची मेन लाईन असलेल्या मुळे गेल्या वर्षी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त नगर परिषद चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सजावट करण्या करिता आलेल्या कलावंतांना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना साठी येणाऱ्या तमाम भिम अनुयायांना त्या नगर परिषद चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील मुख्य विज पुरवठ्याची मेन लाईन मुळे जो काही त्रास व अडचणी सहन कराव्या लागत आहेत तो त्रास व अडचणी पुन्हा कधी भविष्यात निर्माण होऊ नये या करिता भिम आर्मी बल्लारपूर यांच्या वतीने बल्लारपूर नगर परिषद येथील मुख्याधिकारी विशाल वाघ ह्यांना निदेवन देऊन नगर परिषद चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोरील मुख्य विज पुरवठ्याची मेन लाईन 15 दिवसाच्या आत हटवून त्याचे लवकरात लवकर भुमिगत करावे अशी मागणी केली.

जर ही मागणी यशस्वी न झाल्यास भिम आर्मी बल्लारपूर व तमाम भिम अनुयायांनी एकत्र येऊन आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा सुध्दा देण्यात आला. यावेळी निदेवन देताना भिम आर्मी बल्लारपूर चे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष शशिकांत निराजने, शहर उपाध्यक्ष बबलू करमरकर, तालुका अध्यक्ष अमर धोंगडे, अजित पडवेकर, विश्वशांती युवा मंच अध्यक्ष सुमित डोहणे, माजी नगरसेवक अमित पाझारे, प्रदिप झामरे, विक्की दुपारे , दिपक पडवेकर व अन्य भिम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here