सुरज ठाकरे यांना अटक केली नाही तर शिवसेना चंद्रपूर जिल्हा बंदची हाक देणार… – शिवसेना जिल्हाप्रमुख

0
710

सुरज ठाकरे यांना अटक केली नाही तर शिवसेना चंद्रपूर जिल्हा बंदची हाक देणार… – शिवसेना जिल्हाप्रमुख

युवा स्वाभिमानी पक्षाच्या राजुरा येथील कार्यालयात धडक देऊन शिवसेना स्टाईल आंदोलन

 

युवा स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसर्वा आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा या दाम्पत्यांनी थेट मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे जाहिर केल्यानंतर ह्या दाम्पत्याला अटकाव करण्यासाठी मुंबई येथिल मातोश्री बाहेर मागील तीन दिवसांपासून शिवसैनिकांनी ठिय्या दिला. राणा दाम्पत्याला मातोश्रीवर येण्याचे खुले आव्हान दिले होते.

ह्याच संदर्भात युवा स्वाभिमान पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे ह्यांनी फेसबुक वर राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या बाबतीत अश्लील शब्दात टिका करून मुख्यमंत्र्यांना थेट लढतीचे आव्हान दिल्यामुळे बिथरलेल्या शिवसैनिकांनी रात्री साडे आठ च्या दरम्यान जिल्हाध्यक्ष मुकेश जीवतोडे व राजुरा विधानसभा प्रभारी बबन उरकुडे ह्यांच्या नेतृत्वात युवा स्वाभिमानी पक्षाच्या राजुरा येथील कार्यालयात धडक देऊन शिवसेना स्टाईल आंदोलन करून तोडफोड केली.

 

राजुरा, चंद्रपूर, भद्रावती येथील शिवसैनिक युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयावर चालुन गेल्याने काहीवेळ वाहतूक विस्कळित झाली होती. मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनतर शिवसैनिकांनी राजुरा पोलीस ठाण्यात सुरज ठाकरे ह्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असुन बबन उरकुडे ह्यांनी सुरज ठाकरे ह्यांना शिवसेना स्टाईलने धडा शिकविणार असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष मुकेश जीवतोडे ह्यांनी सुरज ठाकरे ह्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. जर पोलिसांनी सुरज ठाकरे ह्यांना अटक केली नाही तर शिवसेना चंद्रपूर जिल्हा बंदची हाक देणार असल्याचेही त्यांनी घोषित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here