वंचित बहजन आघाडी च्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

0
423

वंचित बहजन आघाडी च्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

चंद्रपुर : सत्तावंचित समूहाला सत्तेत बसविण्यासाठी सन 2019 मध्ये सर्व सत्ता वंचित घटकांना सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली सन 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला यश जरी मिळाले नाही, तरी महाराष्ट्रात तिसर्‍या स्थान चा पक्ष म्हणून मतदान घेण्यात यश मिळाले. वंचित बहजन आघाडी ला 24 मार्च 2022 रोजी तीन वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त वंचित बहुजन आघाडी च्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 30 मार्च 2022 रोजी चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यकर्ता मेळाव्याचे उद्घाटक म्हणून जिल्हा प्रभारी माननीय राजेश बोरकर चंद्रपूर जिल्हा तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय भूषण फुसे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर हे राहणार आहेत कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून माजी राज्यमंत्री तथा विदर्भाचे मुख्य समन्वयक माननीय रमेश कुमार गजबे ,राज्य कार्यकारिणी सदस्य माननीय कुशलभाऊ मेश्राम, विदर्भ समन्वयक माननीय अरविंदभाऊ सांदेकर,माननीय राजूभाऊ झोड़े उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून महानगराध्यक्ष बंडुभाऊ ठेंगरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविताताई गौरकार, शहर महिला आघाडी अध्यक्ष तनुजा ताई रायपुरे ,युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ शेंडे,शहराध्यक्ष संदीप देव, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष धीरज तेलंग,उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजय चेतन प्रस्तुत सुमधुर संगीत सांस्कृतिक जलसा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. उपरोक्त कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शहर महासचिव माननीय प्राध्यापक नितीन रामटेके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here