आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर सुरु होणार महाकाली यात्रा

0
732

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर सुरु होणार महाकाली यात्रा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार देणार प्रशासनाला सुचना

आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची शासकीय विश्राम गृहात भेट घेत कोरोनाकाळापासून बंद असलेली माता महाकालीची यात्रा सुरु करण्यात यावी अशी मागणी केली. यावर सकारात्मकता दाखवत सदर यात्रा सुरु करण्याच्या सुचना प्रशासनाला देणार असल्याचे आश्वासन ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. यावेळी महाकाली मंदिर ट्रस्टचे सुनिल महाकाले, आदि गिरवेणी यांचीही उपस्थिती होती.

 

चैत्र महिण्यात भरणा-या महाकाली यात्रेला विशेष महत्व आहे. या यात्रेसाठी राज्यासह लगतच्या राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येतात. याचा परिणाम सहाजिकच रोजगारावर दिसुन येतो. यात्रेदरम्याण अनेकांना रोजगार मिळतो. मात्र कोरोनाकाळापासून सदर यात्रा बंद आहे. याचा परिणाम सहाजिकच पर्यटनासह व्यापारी वर्गावर झाल्याचे दिसून येत आहे. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव संपत आला आहे. अशात कोल्हापूर जिल्हातील प्रसिध्द ज्योतीबाची यात्रा यंदा सुरु करण्याचा निर्णय तेथील प्रशासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर चंद्रपूरात २ एप्रिल पासुन सुरु होणार असलेली महाकाली यात्राही सुरु करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शासकीय विश्राम गृहात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेत केली आहे. यावर सकारात्मक भुमिका घेत सदर यात्रा सुरु करण्याच्या दिशेने प्रशासनाला सुचना देणार असल्याचे आश्वासन ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. त्यामुळे कोरोनाकाळापासून बंद असलेली ही यात्रा यंदा सुरु होणार आहे. याचा मोठा परिणाम धार्मीक क्षेत्रासह, पर्यटन आणि रोजगारावही दिसुन येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here