शिवापूर(बंदर) गावाला मिळाला खाकी वर्दीचा मान

0
553

शिवापूर(बंदर) गावाला मिळाला खाकी वर्दीचा मान

मराठी शाळेचा विद्यार्थी झाला फौंजदार

राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त गावाच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा

 

आशिष गजभिये, चिमूर : तालुक्यातील शिवापूर(बंदर) या गावाची ओळख एक आदर्श गाव म्हणून सर्वदूर आहे.या गावाच्या ग्रामपंचायत ला तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे हस्ते पुरस्कार मिळाला आहे.याच गावातील इतर मागासवर्गीय समाजातील अतुल तराळे या युवकाची कहाणी वडील शेतकरी,घरची परिस्थिती जेमतेम अशाही परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पीएसआय बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.

अतुलचे सातवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले.महाविद्यालयीन शिक्षण भिवाजी वरभे महाविद्यालय,बोथली येथून पूर्ण केलं.गावातील शिक्षित मुलं विविध विभागात उच्चपदस्थ ठिकाणावर कार्यरत आहेत पण अद्यापही गावातील एकही युवक पोलीस खात्याकडे वडला नव्हता अतुल ने खाकी वर्दी चे स्वप्न बाळगलं त्यात त्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला अखेर निकाल जाहीर होताच त्याचं स्वप्न पूर्ण झालं.त्याच्या या यशाने शिवापूर(बंदर) गावाच्या शिरपेचात नव्या मानाच्या तुऱ्याचा समावेश झाला आहे.

आई-वडील अल्पभूधारक शेतकरी असल्याने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अतुल खासगीत नोकरी करून कोणतीही शिकवणी,अभ्यासिका न लावता जिद्द, चिकाटीने अभ्यास करून त्यांने हे यश मिळवले आहे.याचे श्रेय आई-वडील, काका व भावाला दिले आहे.

गावकऱ्यांकडून होणार सत्कार गावाला प्रथमच खाकी वर्दीचा मान मिळवून अतुल तराळे दिला यानी आहे त्याच्यावर विविध स्थरातुन सद्या अभिनंदनाचा वर्षाव सुरू या आहे. प्रथमच गावाला खाकीचा बहुमान मिळवून देणाऱ्या या युवकाचा जाहीर सत्कार ग्रामस्थ करणार आहे.अशी माहिती सरपंच मंजुषा नन्नावरे, उपसरपंच आदित्य वासनिक,ग्रा.प.सदस्य मनी रॉय,प्रमोद कामडी, अनुसया रामटेके,स्वयंसेवी संस्थेचे नीलेश नन्नावरे,बादल श्रीरामे,आशिष जीवतोडे,मिथुन सोगलकर,मंगेश सहारे,अमोल कावळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here