जुनी पेन्शन हा आमचा मूलभूत अधिकार – शिवराम घोती

0
403

जुनी पेन्शन हा आमचा मूलभूत अधिकार – शिवराम घोती

● महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्याध्यक्ष शिवराम घोती यांनी घेतली राजुरा येथे सभा
● राजुरा तालुका संघटनात्मक कार्यकारिणीची केली नेमणूक
● तालुका अध्यक्षपदी अजय पुणेकर, कार्याध्यक्ष प्रा. नरेश नुगुरवार तर कोषाध्यक्षपदी रुपेश चीडे यांची निवड

 

राजुरा, 9 डिसेंबर : वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने आधी डीसीपीएस व नंतर एनपीएस योजना लागू केली. यामध्ये हजारो शिक्षकांचाही समावेश करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता ही योजना फसवी असून जुनी पेन्शन हा आमचा मूलभूत अधिकार आहे व तो हिसकावण्याचे षडयंत्र राज्य शासनाने केले आहे. त्यामुळे संपूर्ण शिक्षकांना फसवण्याचा व त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणाऱ्या या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटन मैदानात उतरली असून जुनी पेन्शन पुन्हा लागू केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटन चे राज्याध्यक्ष शिवराम घोती यांनी केले आहे. राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय डीसीपीएस , एनपीएस धारकांच्या सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर राज्याध्यक्ष शिवराम घोती, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत झाडे, चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष स्नेहलकुमार कांबळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेची राजुरा तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली व त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. राजुरा तालुका अध्यक्षपदी अजय मारॊती पुणेकर, कार्याध्यक्षपदी प्रा. नरेश राजन्ना नुगुरवार तर कोषाध्यक्षपदी रुपेश रामदास चिडे यांची निवड करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन अजय पुणेकर यांनी केले. प्रास्ताविक स्नेहलकुमार कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहनदास मेश्राम यांनी केले. या सभेला महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथिल मुख्याध्यापक सुधाकर उईके उपस्थित होते. तसेच राजुरा तालुक्यातील पेंशन शिलेदार बादल बेले , नंदकिशोर काळे, रूपेश पेंदोर, राजु जुनघरे, दिपक निमकर, मुसा शेख, जयश्री साळवे, इंदुताई झाडे, पुष्पकुमार मेंढे ,लोमेश मडावी व इतर शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here