चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर यांची जिल्हा संपर्क प्रमुख अध्यक्ष पदी निवड

0
451

चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर यांची जिल्हा संपर्क प्रमुख अध्यक्ष पदी निवड

कोरपना प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक १४ मार्च ला सिल्वर क्लब मुंबई येथे गुढीपाडवा निमित्त पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. आणि जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. सचिन भोयर हे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यामध्ये प्रसिद्ध असे मानले जाते आणि त्याच अनुषंगाने सचिन भोयर यांना चंद्रपूर जिल्ह्याचे मोठी जबाबदारी देण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्या उपाध्यक्ष तथा नगरसेवक सचिन भोयर यांची सन्माननीय पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here