दुध पिणारा दिव्यांग भुजंगला सभापती अल्का आत्राम यांनी दिली दुधाळ गाय भेट

0
699

दुध पिणारा दिव्यांग भुजंगला सभापती अल्का आत्राम यांनी दिली दुधाळ गाय भेट

वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

सुधीरभाऊच्या प्रेरणेने वाढदिवसाच्या निमित्याने गरजू लोकांची सेवा करण्याची संधी :- कु. अल्का आत्राम

रुपेश मंकिवार

पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी:- 

पोंभुर्णा तालुक्यातील जाम खुर्द येथे एका गरीब कुटुंबात भुजंग चा जन्म झाला.लहानपासुन तो दुधावर आपली भुक भागवत होता.वयाच्या सतरा वर्षे पूर्ण झाली तरी तो दुधच पित असे घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला कधी कधी उपाशी पोटी राहावे लागत असे हि बाब पोंभुर्णा येथील पंचायत समिती सभापती अल्का आत्राम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या भुजंगला दुधाळ गाय भेट दिली.

 कुमारी अल्का आत्राम सभापती, पंचायत समिती पोंभूर्णा यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच आदिवासी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्ताने देवई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळा येथील मुलांना भोजन, बुक वाटप, कार्यक्रम करण्यात आला.

 जामखुर्द येथील दिव्यांग भुजंग मडावी सतरा वर्षाचा असून तो फक्त दूध पितो अन्नाचा कणही खात नाही त्याला कायमची दुधाची व्यवस्था व्हावी म्हणून त्याला दूध देणारी गाय भेट म्हणून देण्यात आली. तसेच गडचांदूर येथे विजयालक्ष्मी डोहे यांचे वतीने ई-श्रमिक कार्डचे वितरण करण्यात आले. केमारा, भिमणी येथे नोटबुक वितरण करण्यात आले तसेच विविध ठिकाणी क्रांतीविर बाबुरावजी शेडमाके यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here