चंद्रपूरात पार पडली सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट संघटकांची बैठक!

0
433

चंद्रपूरात पार पडली सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट संघटकांची बैठक!
🔵🛑चंद्रपूर 🟢 किरण घाटे🟣🟡 आज रविवार दि.२७डिसेंबरला सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट च्या संघटकांची 252 वी बैठक स्नेह नगर मधील संघटक भास्कर सपाट (चंद्रपूर )यांचे निवास स्थानी सकाळी 9 ते 10:30या दरम्यान पार पडली.

🟣🟢🛑 बैठकीत बहुजन व्यवसायकांची यादी तयार करून बहुजन समाजातील युवकांना व्यवसाय उद्योगासाठी प्रोत्साहन करणे, ओबीसी कर्मचारी संघटना स्थापन करून राज्य स्तरावर ओबीसी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून न्याय मिळविणे, विद्यार्थी संघटनेची उभारणी करणे, महिला संघटनेची उभारणी करणे, सेल्फ रिस्पेक्ट सांस्कृतिक विंग उभी करणे आदि कामे प्रधान्याने करण्याचे या वेळी ठरले.

🛑🟣🟡या पार पडलेल्या बैठकीला मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी मार्गदर्शन केले. 🟨🔸🌼बैठकीत भास्करराव मुन, रवींद्र चिलबुले, सुनील पोराटे, इंजि. सूर्यभान झाडे, डॉ .बाळकृष्ण भगत, राजकुमार जवादे, जयपाल वांढरे, नवनाथ देरकर, अशोक दिघीकर, विलास माथणकर, सौरभ होरे, बंडू चौधरी, डी. डब्ल्यू .सपाट, पी के मोहुर्ले आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here