शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच व शिक्षिकांचा करण्यात आले सन्मानित.

0
526

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच व शिक्षिकांचा करण्यात आले सन्मानित.

हिंगणघाट राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा उपक्रम.

अनंता वायसे

हिंगणघाट:- 22 डिसेंबर 2020
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या हस्ते राष्ट्रवादी महिला काँग्रेस हिंगणघाटच्या वतीने “प्रतिभावंत गुणगौरव” पुरस्कार महिला सरपंच यांच्यासाठी व “ज्ञानदायिनी गौरव” पुरस्कार हा महिला शिक्षकांसाठी प्रदान करण्यात आला.
खरंतर आज महाराष्ट्रातील महिला दिमाखात स्थानिक संस्थांच्या कारभार पाहत दिसतात यावेळी मनापासून आनंद होतो स्व यशवंतराव चव्हाण सत्तेच्या विकेंद्रीकरणावर विशेष भर दिला आणि त्यांचे शिष्य आदरणीय पवार साहेबांनी महिलांना सत्तेमध्ये समान वाटा देऊन महिलांसाठी राजकारण हे क्षेत्र आणखी विस्तृत केलं.
घर आणि कुटुंब सांभाळणारी महिला आज गावाचा कारभार अत्यंत कार्यकुशलतेने सांभाळते सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक सोबतच आरोग्य ,कृषी, पाणीपुरवठा आदी मूलभूत गरजा ओळखून या क्षेत्रामध्ये भरीव काम करण्याची संधी पवार साहेबांनी महिलांना दिली आणि यातूनच शरदचंद्रजी पवार यांनी महिला धोरण उदयास आले. आमची भगिनी चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित होती परंतु शरद पवारच्या महिला धोरणाने तिला सत्तेचा आभाळ कवेत घेण्याचे सामर्थ्य दिलं आज महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे असे सगळेच म्हणतात परंतु यामध्ये महिलांचे योगदान अधोरेखित करण्यासारखा आहे.
खरंतर शरद पवार यांच्या वाढदिवसा महिला सन्मानाचा दिवस आहे आणि म्हणूनच या दिवसाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला.सरपंच सौ.निता सुनिल डंभारे,सरपंच सौ.सुमताई बोंडे,सरपंच सौ.निलिमा माना पोगले,सरपंच सौ. कविता वानखेडे,सरपंच सौ.देशमुख,सरपंच सौ.अलका (नागाजी पारडी) तसेच शिक्षिका सौ.ज्योती बकाने, सौ.माधुरी विहिरकर,सौ.माया चाफले,सौ.वैशाली लांजेवार, सौ.पुंड इत्यादीचा सन्मान करण्यात आला.त्यावेळी शहर अध्यक्ष हिंगणघट राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या मृणाली रिठे, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष कविता मुंगले, माजी नगरसेविका शबनम परवीन, मिनाक्षी ढाकणे,सरपंच विजय बोरकर, शहर अध्यक्ष भुषण पिसे, शकील अहमद, पुंडलिक बकाने, हनुमंत हुलके आदी उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here