विर बाबुराव शेडमाके यांची 189 वी जयंती तालुक्यात ठिकठिकाणी साजरी

0
784

विर बाबुराव शेडमाके यांची यांची 189 वी जयंती तालुक्यात ठिकठिकाणी साजरी

बिरसा मुंडा चौक राजुराराजुरा : आज शहीद वीर बाबुराव शेडमाके जयंती राजुरा येथील बिरसा मुंडा चौक येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन धिरज मेश्राम यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी राजुराचे विजय परचाके, बामनवाडा सरपंचा भारती जगदीश पाल उपस्थित होत्या.
यावेळी बामनवाडा ग्रामसेवक दत्ता कौठाडकर, बामनवडा ग्रामपंचायत सदस्य प्रफुल चौधरी, सदस्या सुजाता मेश्राम, सदस्या समिष्रा झाडे, डॉ. मधुकर कोटनाके ,बंडू मडावी, रमेश आडे, जगदीश पाल, अमोल राऊत, संतोष मडावी, अभिलाष परचाके, लक्ष्मण कुमरे, देवानंद रांजिकर, प्रकाश मरस्कोल्हे, सुशील मडावी, सदानंद मडावी, कुडमेथे, अरुण कुमरे, संतोष कुळमेथे उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या कार्याला उजाळा दिला. सर्वांनी पुष्पमाला व फुले वाहून विनम्र अभिवादन केले.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांची प्रमुख उपस्थितीचनाखा : आज चनाखा येथे विर बाबुराव शेडमाके यांची १८९ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भुषण फुसे होते. यावेळी भुषण फुसे यांच्या हस्ते विर बाबुरावजी शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी भगीरथ वाकडे, अमोल राऊत, गजानन कुळसंगे, सोमेश्वर मडावी, प्रशांत गेडाम, प्रतीक मेश्राम, विशाल मडावी‌, सुनिल मडावी उपस्थित होते. तर सुशिपाल रामटेके, प्रविण रामटेके, राजकुमार रामटेके, सुदर्शन कुळमेथे, तरण मडावी, सुर्यभान तोडासे, उत्तम गेडाम, सुशिल मडावी, सदानंद मडावी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी परिश्रम घेतले. सर्व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. ग्रामपंचायत चनाखा येथे विर बाबुराव शेडमाके व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले व सर्व बांधवांना संबोधित केले. बहुसंख्येने ग्रामस्थ हजर होते. या कार्यक्रमाचे आयोजन कर्ते यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here