सामाजिक कार्यकर्ते राजकुमार खोब्रागडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

0
446

सामाजिक कार्यकर्ते राजकुमार खोब्रागडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

चंद्रपूर : समाज कार्यात अग्रेसर असणारे तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत धावपळ करणारे राजकुमार खोब्रागडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामपंचायत पद्मापूर येथील संविधान ग्रामसंघ सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर रक्तदान शिबिरात गावातील ज्येष्ठ नागरिक महिला व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, गावातील ज्येष्ठ नेते सदाशिव तुरानकर, पंचायत समितीचे सदस्य दिगंबर दुर्योधन, पद्मापूर ग्रामपंचायतचे सरपंच बाबुराव ठाकरे, पद्मापूर ग्रामपंचायतच्या सरपंचा आम्रपाली शैलेश अलोने, दुर्गापुर चे सरपंच अमोल ठाकरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, ग्रामपंचायत सदस्या सोनाली राहुल ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य कमलाकर खोबरागडे, सामाजिक कार्यकर्ते सदाशिव खोब्रागडे, महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता दहेगावकर, युवा नेते निखिल दुर्योधन, मनीष शेठी, भटाडीचे सामाजिक कार्यकर्ते सचिन उपरे, शैलेश अलोणे तसेच गावातील जेष्ठ नागरिकांची व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here