ख्वाजा गरीब नवाज यांचे वार्षिक उर्स निमित्त AIMIM कडून सरकारी दवाखान्यात फळ व बिस्कीटचे वाटप

0
455

ख्वाजा गरीब नवाज यांचे वार्षिक उर्स निमित्त AIMIM कडून सरकारी दवाखान्यात फळ व बिस्कीटचे वाटप

कोरपना/प्रतिनिधी : देशाचे महान सुफी संत ख्वाजा गरीब नवाज अजमेर याचा वार्षिक ऊर्स देशभरात मोठ्या उत्साहात मनवला जातो. त्याच धर्तीवर गडचांदुर येथील ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलेमीन अर्थात AIMIM या राजकीय संघटना कोरपना तालुक्याचे वतीने गडचांदुर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप केले.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय घाटे, डॉ. प्रशांत गेडाम, डॉ. एस. एच. नामपल्ले, मनीषा कणाके, कल्पक व पक्षाचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष मो. रफिक शेख, उपाध्यक्ष अब्दुल हफिज अ. गनी, शहर अध्यक्ष मुनाफ शरीफ शेख, उपाध्यक्ष मो. रऊफ मो. शरीफ, सचिव मो. सोहेल, दस्तगीर रझाक शेख, शेख कादर शब्बीर शाह, नासीर खान पत्रकार, शेख गनी, शेख अकबर, शेख फिरोज, शेख युसुफ, शेख रमजान, वसीम रिजवी सह अन्य कार्यकर्ते हजर होते. सर्व पदाधिकारी यांनी या प्रसंगी कोविड 19 नियमाचे तंतोतंत पालन करण्याचे वचन घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here