सिरोंचा -आल्लापल्ली मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आविसं कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

0
510

सिरोंचा -आल्लापल्ली मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी आविसं कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

माजी आमदार दिपक आत्राम यांच्या नेतृत्वात आविसं शिष्टमंडळाने घेतली अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट

खड्डे न बुजविल्यास आविस ने दिला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

 

सिरोंचा/गडचिरोली, सुखसागर झाडे

सिरोंचा- आल्लापल्ली व आसरअल्ली या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवरील पडलेले मोठे मोठे खड्डे तात्काळ बुजविण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी संघ शाखा सिरोंचाचे शिष्टमंडळाने आज माजी आमदार व आविस नेते दिपक दादा आत्राम यांच्या नेतृत्वात गडचिरोली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेश जाधव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

सिरोंचा -आल्लापल्ली व आसरअल्ली या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांपासून मोठं मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे गरोदर माता,विविध आजाराचे ग्रस्त रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

सिरोंचा तालुक्यातील नागरिकांसाठी खड्ड्यांची खूप मोठी समस्या निर्माण झाले असून या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तात्काळ न बुजविल्यास आविस शाखा सिरोंचा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
गडचिरोली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेश जाधव यांच्यासोबत वरील दोन्ही रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासंदर्भात चर्चा केली. चर्चेनंतर माजी आमदार व आविस नेते दिपक दादा आत्राम यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

गडचिरोली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी जाधव यांना निवेदन देतांना माजी आमदार दिपक आत्राम सोबत आविसचे ज्येष्ठ नेते मंदा शंकर, बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव, आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम, आल्लापल्लीचे माजी सरपंच विजय कुसनाके,आविस सल्लागार रवी सल्लम,गरकापेठाचे सरपंच सुरज गावडे, मारोती गणापूरपू,साई मंदा,रवी कुंमरी सह आविस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here