वन हक्क जमीन पट्टया करिता राष्ट्रवादीचा मोर्चा धडकला

0
508

वन हक्क जमीन पट्टया करिता राष्ट्रवादीचा मोर्चा धडकला

 

कोरपना : राजुरा उपविभागीय कोरपना व जिवती तालुक्यातील गैर आदिवासी व आदिवासी चे वन हक्क दावे नाकारल्यामुळे अनेक कुटुंब हक्कापासून वंचित झाल्याने व वन विभाग अतिक्रमण हटवण्यासाठी मोहीम हाती घेऊन अतिक्रमण हटवण्याचा धडाका सुरू केल्याने पहिल्याच दिवशी मांडवा येथे वामन कोल्हे यानी विष प्राशन करून जीवन संपवण्याचा निर्णय घेऊन विषारी औषधामुळे पाच दिवस जिल्हा ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यूशी झुंज दिली असाच प्रकार अनेक ठिकाणी घडतील असी शक्यता नाकारता येत नाही.
जिवती व कोरपना तालुक्यातील हजारो शेतकरी अतिक्रमणावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे१९७२ते १९७८ या कालावधीमध्ये जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावर हजारो पट्टे देऊन त्यांच्या वस्त्या बसून सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिले मात्र पिटीशन क्रमांक३६०६/२०१५ मध्ये शासनाने अनेक जमिनी विवादग्रस्त घोषित केल्याने नवीन वादाला तोंड फुटणार आहे१९६० पूर्वीच्या कोणताच रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने तीन पिढ्यांचा पुरावा देणे शक्य नाही त्यामुळे ती अट रद्द करून वन विभागाची जुलमी कारवाई थांबवण्यात यावे२००५ पूर्वीचे सर्व अतिक्रमण पट्टे नियमित करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आबिद अली यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे प्रधानमंत्री वन पर्यावरण मंत्री मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार ,यांना तहसीलदार कोरपणा यांच्यामार्फत निवेदन पाठवण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कार्तिक गोल्नावार, रामभाऊ कोल्हे, विजय नक्षीने, संतोष भुसे, लखमापूर ,रुपापेठ, परसोडा, सावलहीरा ,मांडवा , पार्डी येरगव्हान, इत्यादी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व अतिक्रमणधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here