हिंगणघाट मोहता मिल कामगारांच्या विविध समस्यांबाबत 14 जानेवारीला मंत्रालयात मुंबई येथे बैठक

0
610

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

हिंगणघाट मोहता मिल कामगारांच्या विविध समस्यांबाबत 14 जानेवारीला मंत्रालयात मुंबई येथे बैठक.

माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या मागणीला यश.

हिंगणघाट:- 13 जानेवारी 2020
हिंगणघाट येथील मोहता मिल ,इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क, गिमा टेक्स वणी, गिमा टेक्स हिंगणघाट ,आर.एस.आर मोहता मिल कामगारांच्या अनेक समस्याच्या सोडवणुकीबाबत येत्या 14 जानेवारीला मंत्रालयात राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी बैठक आयोजित केली आहे.मिल कामगारांनी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन समस्या मांडल्या होत्या त्यावेळी कामगारमंत्र्यांन सोबत दूरध्वनी द्वारे संपर्क साधून कामगारांच्या गंभीर समस्यांचा निपटारा लवकरात लवकर करण्याची मागणी पत्राद्वारे सुद्धा केली होती त्या मागणीला यश आले असून त्यानुसार मंत्रालय मुंबई येथे ही बैठक कामगारांच्या उपस्थित माजी आमदार प्रा.राजू तिमांडे कामगारांच्या समस्या कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासमोर बैठकीदरम्यान मांडणार आहे.
आर.एस.आर मोहता मिल्स व्हिविंग अंड स्पेलिंग मिल हिंगणघाट येथील कपडा खाता बंद केल्यामुळे कामगारांना व्ही.आर.एस देण्यात यावे,हिंगणघाट इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क येथील कामगारांना फॅक्टरी ऍक्‍टनुसार सुविधा देण्यात यावी, गिमा टॅक्स वनी येथील कंपनीच्या कामगारांना व्यवस्थापनाकडून होत असलेल्या अन्यायाबाबत तसेच गिमा टॅक्स वणी येथील निवडणूक घेण्यात यावी.
फोल्डिंग आणि प्रोसेसिंग या खात्यातील कामगारांचा ऑक्टोंबर 2020 या महिन्यापासून पगार झाला नाही, डिसेंबर 2019 गेल्या दोन वर्षांपासून प्रोसेसिंग आणि फोल्डिंग हे खाते मनमर्जी बंद केलेले आहे त्यामुळे कामगारांच्या हाताला काम नाही, झालेल्या बैठकीत कामगार कमिशनर नागपुर यांनी कामगारांना पूर्ण पगार देण्याचे आदेश दिले असतानासुद्धा त्यांना 16 डिसेंबर 2019 पासून बेकायदेशीर लेआॅफ (अर्धा पगार) देत आहे जेकी पूर्ण पगार देण्याचे आदेश आहे.
अन्यथा मोठा मिल कामगारांचे म्हणणे असे आहे की मिल चालू ठेवा नाहीतर कायदेशीर व्ही.आर.एस देण्यात यावे.
या सर्व मोहता मिल कामगारांच्या मागण्या त्वरित प्रशासनाने सोडविण्यात आल्या नाही तर कामगार सहकुटुंब आमरण उपोषणाला बसणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी मोहता मिल व्यवस्थापनाची व प्रशासनाची राहील नाही तर संपूर्ण कुटुंबा सहित आत्मदहन करावे लागेल याव्यतिरिक्त कामगारांकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही, कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे गेल्या 2 वर्षापासून आम्ही त्रस्त आहोत तरी लवकरात लवकर दखल घेण्यात यावी असे आव्हानही कामगारांच्या वतीने करण्यात आले होते.या सर्व मागण्यासाठी हि बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकीला माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ,कामगार विभागाचे प्रधान सचिव,कामगार आयुक्त मुंबई ,अप्पर कामगार आयुक्त नागपूर ,कामगार विभागाचे उपसचिव, तसेच हिंगणघाट इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क, आर एस आर मोहता मिल हिंगणघाट गिमा टॅक्स वणी व हिंगणघाट यांचे व्यवस्थापन व कामगार प्रतिनिधी तसेच सर्व संबंधित अधिकारी यांना उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here