गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घ्या – आ. किशोर जोरगेवार

0
436

गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घ्या – आ. किशोर जोरगेवार

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत केली मागणी

 

 

ओमायक्रोनचा वाढता धोका व बंद असलेली बससेवा लक्षात घेता गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना केली आहे. सदर मागणीचे निवेदनही त्यांच्या वतीने देण्यात आले आहे.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमूळे सर्व महाविद्यालये बंद होती. मात्र शासन धोरणाप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस नियमित सुरु होते. आता कोरोनाचा प्रसार मंदावल्याने महविद्यालय नियमित सुरु झाले असले तरी अजूनही वसतिगृह सुरु झालेली नाहीत. त्यातच महाराष्ट्र परिवहन सेवा खंडित असल्यामुळे बाहेरगावी असलेले विद्यार्थी अद्यापही महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहिलेले नाही. अश्यातच आता विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत राज्यात कोरोना चा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा प्रसार वाढत असून बहुसंख्य विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही तसेच नियमित बससेवेचा अभाव, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, बंद वसतिगृह आणि अपूर्ण लसीकरण या सारख्या समस्यांमुळे विद्यार्थांपुढे ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देण्यास अडचण निर्माण झालेली आहे. त्यामूळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून गोंडवाना विद्यापीठातील सर्व परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी अशी मागणी सदर निवेदनाच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here