गडचांदुरातील औद्योगिक प्रदुषणाच्या विरोधात नागरिकांचा एल्गार

0
443

गडचांदुरातील औद्योगिक प्रदुषणाच्या विरोधात नागरिकांचा एल्गार

डॉ. चोपणे यांच्या उपस्थितीत सहविचार सभा संपन्न

 

 

कोरपना प्रवीण मेश्राम
कोरपना – टीम मुवमेंट अगेंस्ट पोल्युशन गडचांदूरच्या वतीने ५ डिसेंबर रोजी येथील महात्मा गांधी विद्यालयात पर्यावरणतज्ज्ञ तथा खगोलशास्त्रज्ञ प्रा. डॉ. सुरेश चोपणे यांच्या नेतृत्वात औद्योगिक प्रदुषणाच्या विरोधात सहविचार सभेचे आयोजन पार पडले.
अध्यक्षस्थानी प्राचार्या स्मिता चिताडे उपस्थित होत्या. तर उमाकांत धोटे, डॉ.प्रवीण लोणगाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत स्थानिक जुन्या माणिकगड व नवीन अल्ट्राटेक सिमेंट गडचांदूर या कंपनीतून सतत होत असलेले वायू प्रदूषण कायमचे हद्दपार करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शहरातील संघर्षशील नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लोकप्रतिनिधी, चिकित्सक आणि महिला यांना घेऊन एक मोठी सर्वसमावेशक कृति समिती तयार करण्यात आली. कारखान्याच्या वायू प्रदुषणाच्या विरोधात गडचांदूर वासीयांच्या अनेक तक्रारी आहे. परंतू येथील लोकांमध्ये एकतेचा अभाव असल्यामुळे जनआंदोलन होवू शकले नाही. यापुढे मात्र गडचांदूरवासीयांनी एकत्र येऊन प्रदूषणाविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला.
समितीने कंपनीशी सुद्धा बोलून त्यांची बाजू जाणून घेतली. सीएसआर फंडातून गडचांदूरसाठी आरोग्यविषयक सर्व्हेक्षण करून मोफत रोगनिदान शिबीर, वृक्षारोपण, जनजागृती असे उपक्रम राबविण्याचा सल्ला समितीने दिला. आरोग्याच्या समस्या लक्षात घेता शहरवासीयांना प्रदूषणाबाबतीत आवाज उठवण्याचा कायदेशीर अधिकार आहे. येत्या 15 दिवसात जर प्रदुषणावर नियंत्रण आणले नाही तर निश्चितच आंदोलन करण्याचा इशारा उपस्थित नागरिकांनी कंपनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी प्रा.डॉ. सुरेश चोपणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर सभेत नुतेश डाखरे, विक्रम येरणे, अरुण निमजे, विजयालक्ष्मी डोहे या नागरिकांनी प्रातिनिधिक तक्रारी मांडल्या.
संचालन प्रा.आशिष देरकर यांनी केले तर आभार अनंत रासेकर यांनी मानले. यशस्वितेकरिता टीम मूव्हमेंट अगेंस्ट पोलुशनच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here