धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा

0
431

धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा

कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे मागणी

 

महाराष्ट्राचे कृषिमंत्रि नामदार दादा भुसे यांना भेटून धान उत्पादक शेतकऱ्याच्या समस्या आणि त्यांना दिलासा देण्यासाठी एकूण दहा मागण्याचा निवेदन देऊन मंगेश पोटवार यांनी थोडक्यात चर्चा केली त्यावर भुसे यांनी आपल्या मागण्याचा गांभीर्यपुर्वक विचार करून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आश्वासन दिले.

मागण्या मध्ये प्रमुख मागणी 1)धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति की. 1000 रुपये बोनस द्यावा,2)अल्पभूधारक शेतकऱ्याचं पिक विमा शासनाने काढावा3) चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना झटका मशीन 100% अनुदानावर द्यावी 4)औषध कंपन्यांना सरकारी नियंत्रणाखाली आणून औषधांचे दर ठरवावे अशा मागण्यासह एकूण दहा मागण्याचे निवेदन दिले. यावेळी मंगेश पोटवार, सामाजिक कार्यकर्ते गौरव श्यामकुळे, टेकडीचे सरपंच सतीश चौधरी, उपसरपंच शंकर सिडाम, ग्रामपंचायत सदस्य अमित घडसे, सामाजिक कार्यकर्ते किसन गुरूनुले, आनंदराव गोहणे यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here