रायपूरे, खैरकर परिवारातर्फे आनंद बुद्ध विहाराला शीतशवपेटी दान

0
489

रायपूरे, खैरकर परिवारातर्फे आनंद बुद्ध विहाराला शीतशवपेटी दान

 

काल दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी स्मृतिशेष जेष्ठ समाजसेवी मोहन रायपूरे आणि कवडु खैरकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी रायपूरे आणि खैरकर परिवारा तर्फे आनंद बुद्ध विहाराला शीतशवपेटी दान करण्यात अली.

यावेळी बौद्ध भिक्खू श्रध्दारक्षित महाथेरो यांच्या हस्ते पूजाअर्चना करण्यात आली. धम्मप्रचारक प्रा. रवी कांबळे, विपश्यनाचारी बाबुराव शिंदे आणि बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष इंजि. तथागत पेटकर यांनी स्मृतिशेष जेष्ठ समाजसेवी मोहन रायपूरे व कवडु खैरकर यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केली.

याप्रसंगी रायपूरे तथा खैरकर परिवारातील सदस्य लताताई रायपूरे, संगीता रायपूरे, मनीष रायपूरे, सुशीलाताई खैरकर, मंगल खैरकर, रोशन खैरकर इतरही परिवारातील सदस्यासह बौद्ध समाज मंडळातील सचिव बंडू वाघमारे, प्रीतम कवाडे, प्रज्ञा करुणा महिला मंडळाच्या अध्यक्षा निर्मला पाटील, उषा नगरकर, उषा तामगडे, अनिता सरोदे सह शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here