कोरपना नगर पंचायत चे आरक्षण जाहीर

0
496

कोरपना नगर पंचायत चे आरक्षण जाहीर

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
दि.१२ नोव्हेंबर, कोरपना नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक – २०२१ साठी सुधारित आरक्षणाची सोडत आज शुक्रवारला जाहीर करण्यात आली.
या सोडतीत प्रभाग क्रमांक एक व सतरा नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), प्रभाग क्रमांक दोन नागरीकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग क्र. तीन, चार, पाच, सात, नऊ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सहा, आठ, बारा, पंधरा सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक दहा अनुसूचित जमाती, प्रभाग क्र सोळा अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जाती (महिला), प्रभाग क्रमांक तेरा, चौदा अनुसूचित जमाती महिला साठी आरक्षित करण्यात आला आहे.
आरक्षण सोडत राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here