चंद्रपूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र अर्थात कॉमन सर्विस सेंटर (CSC) येथून शेतकऱ्यांना मिळणार माती परीक्षण चा लाभ

0
494

चंद्रपूर जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र अर्थात कॉमन सर्विस सेंटर (CSC) येथून शेतकऱ्यांना मिळणार माती परीक्षण चा लाभ

शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून उत्पन्न वाढी साठी पुढे यावे – विक्रम दलाल यांचे आवाहन

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून माती परीक्षण ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे आपल्या शेत जमिनीची प्रतवारी माहिती करून घेण्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे असते, त्या साठी प्रत्येक शेतकऱ्यांनी पुढे येऊन माती परीक्षण करून घ्यावे असे आवाहन विक्रम दलाल यांनी केले आहे. कार्यक्रमाचे उदघाटक भाऊसाहेब बऱ्हाटे, प्रकल्प संचालक आत्मा चंद्रपूर, अध्यक्षस्थानी सुरेशराव गरमडे, कृषिरत्न पुरष्कृत शेतकरी हे लाभले होते.

भूमी प्रयोगशाळा पुणे, केंद्र व राज्य सरकार मान्यता प्राप्त आपले सरकार सेवा केंद्र, शेतकरी उत्पादक संस्था वरोरा तसेच जिल्ह्यातील कॉमन सर्व्हिस सेंटर च्या माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे नमुने व फी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे जमा केल्यानंतर जमिनीचा पूर्ण अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानुसार आपल्या शेतातील कोणत्या उत्पनासाठी जमिनीत कोणते घटक कमी व जास्त आहेत. त्या नुसार खते, औषधीचा वापर करून आपले उत्पन्न वाढीसाठी भरपूर फायदा होणार आहे. या सुविधा सुरू केल्या बद्दल गडचांदूर व परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र चालकांचे अभिनंदन केले असून आभार मानले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात सदर माती परीक्षण केंद्र सुरू करण्यासाठी भूमी प्रयोगशाळा चे महाराष्ट्र राज्य चे समन्वयक विक्रम दलाल, सी एस सी चे प्रकल्प संचालक निलेश कुंभारे जिल्हा समन्वयक स्वप्नील सोनटक्के यांचे मार्गदर्शनाखाली व चंद्रपूर जिल्हा सी एस सी, वि एल ई सोसायटी यांच्या सहकार्याने वरोरा एफ पी ओ चे संचालक पांडुरंग गावंडे यांनी अथक परिश्रम घेतले. शेतकरी मेळाव्याचे माध्यमातून अधुनिक शेती व्यवसाय सुरू करणे काळाची गरज आहे असे मत अनेक वक्त्यांनी मांडले.

या वेळी उज्वला योजना लाभार्थ्यांना गॅस वितरण, ई श्रम कार्ड वितरण करण्यात आले. शेती उपयोगी औजारे व यंत्रांची प्रदर्शनी लावण्यात आली होती. कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पटांगणात आयोजित या कार्यक्रमाला वरोरा परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना या बाबत ची माहिती देऊन मातीचे नमुने व फी घेऊन सी एस सी सोसायटी च्या प्रतिनिधी कडे किंवा वरोरा एफ पी ओ कडे जमा करावे व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष विनोद खंडाळे व सचिव उद्धव पुरी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here