ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत चक्क देशी दारू चा ठराव घेण्याचा ग्रामसेवकाचा प्रयत्न

0
741

ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत चक्क देशी दारू चा ठराव घेण्याचा ग्रामसेवकाचा प्रयत्न

राजुरा/ प्रतिनिधी

बामनवाडा ग्रामपंचायत च्या पदाधिकारी यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत चक्क देशी दारू चा ठराव घेण्याचा ग्रामसेवका चा प्रयत्न असून दिनांक 28/10/2021 ला ग्रामसभा ठेऊन सदर ग्रामसभेत सरकार मान्य देशी दारू साठी नाहरकत प्रमाणपत्र देणे बाबत विषय ठेवण्यात आल्याने गावातील सर्व नागरिकांच्या भोवया उंचावल्या आहेत. गावात गरीब वर्ग मोठ्या प्रमाणावर असताना देशी दारूचा विषय ग्रामसेवकांना सुचातोच कसा? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

ग्रामपंचायत च्या सरपंच्या सौ. भारती पाल यांनी गावाचा विकास हाच माझा ध्येय असे स्वातंत्र्य दिनी प्रण घेतले असताना सरपंच्या भारती पाल यांच्या ध्येयाला केराची टोपली देऊन गावात दारिद्र्याचे प्रमाण वाढविण्याचे काम ग्रामसेवक करतो कशाला असा सवाल नागरिक करीत आहेत.

ग्राम पंचायत ला महिला पाच निवडून आल्या असून पुरुष चार निवडून आलेले आहेत. तसा बहुमत महिलांचा असून सर्वानंद वाघमारे हे शिक्षित असून सरपंच पद भोगलेले व्यक्ती आहेत. मात्र त्यांचा विरोध देशी दारूला दिसत नसल्याने शंका कुशंका नागरिकांच्या मनात आली असून फक्त बगीचा करून त्या बगीच्यात दारू पिऊन लोकं येतील आणि बागीच्याची शान वाढेल असा मनसुबा तर नसावा असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सरपंच बनल्या नंतर सरपंच बनण्यासाठी आलेला खर्च कुठून काढायचा असा प्रश्न सरपंच यांच्या कुटुंबीयांना पडला आहे. यामुळे देशी दारूतून झालेला खर्च काढावा हा प्रयत्न तर नसावा अशा अनेक शंकेला नागरिक बळी पडलेले दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here