स्नेहा कातकरचे सेट परीक्षेत सुयश
राजुरा येथील रहिवासी स्नेहा सत्यपाल कातकर दि.22.2.21 ला जाहीर झालेल्या आंध्रप्रदेश स्टेट इलिजिबिलीटी टेस्टमध्ये Earth, Atmospheric,Ocean & Planetary Science या विषयामध्ये सेट परीक्षा पास झाली आहे, सदर विषयामध्ये फारच कमी विध्यार्थी पास होत असतात ,स्नेहाने सदर परीक्षा सामान्य प्रवर्गातून पात्र केल्यामुळे स्नेहा कातकरचा भारतातील केंद्रीय विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . स्नेहा कातकर कातकर कुशाग्र बुद्धीमत्ता प्राप्त असून ,यापुर्वीही तिचे भारतातील समस्त विद्यापीठ,आयआयटी पीएचडी स्कॉलर मधून पन्नास निवडक संशोधकामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट सायन्स ,बंगलोर येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग , भारत सरकार द्वारा *ग्लेशर स्टडी ऍण्ड रिमोट सेनसिंग* या दहा दिवसीय प्रशिक्षणसाठी 2019 मध्ये संपूर्ण भारत देशातून स्नेहाची निवड करण्यात आली होती तसेच केंद्रीय विद्यापीठ द्वारा घेतल्या गेलेल्या पीएचडी प्रवेश परीक्षेत सुद्धा स्नेहा मुलीतून भारतातून प्रथम क्रमांकाने पास झाली आहे .स्नेहाचे प्राथमिक शिक्षण न.प. प्राथमिक शाळा ,राजुरा येथून झाले तर वर्ग पाचवा ते एच.एच. सी. पर्यंत विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांकाने जि.प.ज्युनिअर कॉलेज राजुरा येथून झाले तसेच बी.एस्सी (आनर्स) ते एम.एस्सी (Applied Geology & Geoinformatic) मध्ये सेन्ट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटका ,गुलबर्गा येथून मेरिट मध्ये झाले आहे तसेच ती आज रिमोट सेनसिंग मध्ये प्रोफेसर श्रीमती डॉ. नुका रत्नम यांचे मार्गदर्शनाखाली आदीकवी नन्नय्या विश्विद्यालय,राजमंड्री आंध्रप्रदेश येथे 2019 पासून Ph.D. करीत आहे व तिथे सुद्धा तिला गुणवत्ता आधारावर प्रथम क्रमांकाने प्रवेश मिळाला आहे तसेच तिने प्री पीएचडी ही प्रथम क्रमांकाने पास केले आहे, स्नेहा राजुरा येथिल प्रख्यात मनोवैज्ञानिक डॉ.सत्यपाल कातकर यांची कन्या असून त्यांनी आपल्या मुलांना देशातील नामवंत विश्वविद्यालयात अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण दिले आहे व त्याच बरोबर नागपूर विभागातील अनेक होतकरू विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मनोवैज्ञानिक समुपदेशन करीत आहेत ,तसेच संपूर्ण देशात ऑनलाईन मनोवैज्ञानिक समुपदेशन करून अनेक गरजुवंताना लाभ देत आहेत.स्नेहा कातकरचे संपूर्ण शिक्षण शासकीय संस्थेत झाले आहे तसेच ती कधीही कुठल्याही खाजगी शिकवणीला गेली नाही,ती आपल्या यशाचे श्रेय छोटा भाऊ सिद्धांत कातकर, गुरुजन व आईवडील ह्यांना देते ,तिच्या कर्तृत्ववामुळे राजुरा शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर बौद्धिक दृष्टीने लौकिक झाले आहे ,तिच्या भविष्यातील उत्कर्षासाठी प्राचार्य एम.एस.राऊत , प्रा.डॉ.नुका रत्नम,राजमंड्री , प्रा.डॉ. अनिल चौखुंडे ,प्रा.शीतल शेंबाळकर,प्रा प्रज्ञा कातकर,प्रा.डॉ.वाय. एफ.खोब्रागडे,फॅनी कातकर ,राजेश चटके ,सिद्धांत कातकर,भगीरथ वाकडे ,किशोर रामटेके ,गंगारामजी ठेंगरे,गणपत पुणेकर,विजय तेलंग,महानंद वाकडे,जेकब साळवे ,बिंदुसार गजभिये ,बी.एस. पावडे ,विजय उपरे ,उमेश खंगार,दिगंबर भाके, राजेशकुमार लोखंडे नागपूर,ऍड.भुपेंद्र रायपूरे, ऍड.विजय पुणेकर,राजरत्न रामटेके ,डेप्युटी फायनान्स मॅनेजर,प्राचार्य रवींद्र पडवेकर ,प्रा. श्रीनिवास कुंम्मरवार ,जितेंद्र मेश्राम सर,सिद्धार्थ जाधव ,भगवंत अहिरे,सिद्धार्थ वरघडे आदींनी अभिनंदन केले आहे…
