मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धाड

0
454

मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धाड

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले
मारेगाव शहरात सध्या अवैध दारू दारु विक्रेत्यांनी डोके वर काढले असून दुर्गा उत्सव,दसरा,ईद मिलाद यासारख्या सनामध्ये शहरातील अवैध दारू विक्रेत्यांनी दारू विक्रीचा जोर वाढला आहे . नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजेश पुरी अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे.

 

सध्या शहरात अवैध दारूविक्रेत्यांनी बरेच वर डोके काढले आहे. शहरातील आजुबाजुच्या परिससात अवैध व्यवसाय बेफामपणे चालविला आहे.

सध्या दुर्गादेवी विसर्जन असल्याने दारू विक्रीचे दुकान बंद असल्याने या या बंदचा पुरेपूर फायदा घेत जुन्या पोस्ट आफिस जवळ चक्क हनुमान मंदिर च्या बाजूला खुलेआम दारूविक्री सुरू होती.यावेळी परिसरातील अवैध दारू विक्री सुरु असल्याची माहिती नागरिकांनी मारेगाव पोलिसांना दिली. माहितीनुसार जमादार आनंद अलचेवार यांनी अवैध देशी दारूचे २२ शिशा जप्त केले.मात्र विक्रेता हातावर तुरी देऊन पोबारा झाला आहे. याघटनेचा तपास पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार आनंद आचलेवार करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here