नारंडा, वनोजा येथे जाणाऱ्या बसचे वनसडीत स्वागत

0
486

नारंडा, वनोजा येथे जाणाऱ्या बसचे वनसडीत स्वागत

जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना दिलासा, युवा नेते रोशन आस्वले प्रयत्नांना यश

 

कोरपणा, प्रतिनिधी

वनसडी : नारंडा व वनोजा येथे जाणाऱ्या बसेस नारंडा फाट्यावरून जात होत्या ह्या सर्व बसेस वनसडी बस स्थानकाला येत नव्हता याचा त्रास वृद्ध नागरिक व विद्यार्थ्यांना होत होता . राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे व जेष्ठ नेते राजाबाबू गलगट यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन आस्वले यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सदर सर्व बसेस वनसडी बस स्थानकापर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्न केला व दिनांक 12-10-2021 पासून वनोजा व नारंडा येथे जाणारी बस ,बस स्थानकावर आली या बसचे स्वागत युवा नेते रोशन आस्वले ,विजय पिंपलशेंडे , ज्ञानेश्वर पिंपळकर , महेश फरकाड़े , प्रमोद बुरांडे यांनी केले.
वनसडी हे कोरपणा तालुक्यातील महत्वाचे गाव असून, आठवडी बाजार, बँक ऑफ इंडिया ची शाखा व विविध शासकीय कार्यालये आहेत त्यामुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांना या बसेसचा उपयोग होईल व महामंडळाला आर्थिक लाभ सुध्दा होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here