“अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा” १२ ऑगस्ट रोजी राज्यभरात घेण्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आवाहन

0
859

“अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा” १२ ऑगस्ट रोजी राज्यभरात घेण्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आवाहन

मुंबई/चंद्रपूर, दि. 11 ऑगस्ट : स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे राज्य शासनातर्फे आयोजन करण्यात येत आहे याअंतर्गतच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत १२ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यभारात अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.शासनाच्या सर्व विभागांनी आपल्या स्तरावर “अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा” घ्यावी असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे

प्रिय मित्रानो.,तरुणाई ही कोणत्याही राष्ट्राची ऊर्जा असते आणि तरुणांच्या शक्तीचे समाज आणि देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी नशामुक्त भारत अभियानात सहभागी होणे अत्यंत गरजेचे आहे. देशासमोरील हे आव्हान स्वीकारून आज आपण नशामुक्त भारत अभियानांतर्गत एकजूट होऊ आणि केवळ समाज, कुटुंब, मित्रच नव्हे तर आपण स्वतः ही नशामुक्त होऊया कारण बदलाची सुरुवात स्वतःपासूनच झाली पाहिजे.

चला तर मग आपण सर्वांनी मिळून आपला जिल्हा / राज्य (नाव) नशामुक्त करण्याचा दृढ संकल्प करूया. मी प्रतिज्ञा करतो की, माझा देश नशामुक्त करण्यासाठी मी माझ्या क्षमतेनुसार शक्य ते सर्व प्रयत्न करेन.

जय हिंद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here