गडचांदुर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ०६ मधील ४० ते ५० घरातील कुटुंब मूलभूत गरजांपासुन वंचित, नागरिकांमध्ये रोष 

0
470

गडचांदुर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ०६ मधील ४० ते ५० घरातील कुटुंब मूलभूत गरजांपासुन वंचित, नागरिकांमध्ये रोष 

 

कोरपना /प्रतिनिधी : गडचांदुर शहराला लागून नविन वस्ती मध्ये नागरिक ५ ते ६ वर्षापासून तिथे गुंठेवारी प्लॉट खरेदी करून नागरीक राहत आहे. गडचांदुर शहरात नविन वस्ती मध्ये वसाहत करणाऱ्या घर धारकाकडून कोणत्याही प्रकारची कर नगर परिषद आकारत नसल्याने नगर परिषदेची तिजोरीत घट पडला व नगर विकास मंत्रालयाला जाणारा महसूल कर जात नसल्याने शासनाचं खूप मोठ नुकसान होत आहे. आणि त्यामुळे घर धारकांना शासनाच्या सोयी सुविधा, योजनांचा लाभ नागरीकांना घेता येतं नाही आहे. गुंठेवारी प्लॉट असल्याने नगर परिषद प्रशासन म्हणत आहे की, ले – आऊट विक्री मालकाच नाली, रस्ते, रोड हे काम आहे, असं सांगून ह्या मुद्द्याला बागळण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्र जमिन महसूल १९६६ च्या नियमानुसार ४२ (ब), ४२ (ड), ४२ (क) कलमानुसार गावठाण्यापासून २०० मीटर जवळ अंतरावर असलेल्या समाविष्ट गटाच्या जमिन मालकांना बिनशेती परवानगीची आवश्यकता नाही. गावठाण्यापासून २०० मीटर जवळ अंतरावर असलेल्या समाविष्ट गटाचे ले – आऊट नगर परिषदेने आपल्या ताब्यात घेऊन घर धारकांकडून कर गोळा करावा हा शासनाचं परिपत्रक आल्यावरही कोणत्याही प्रकारचं नगर परिषद हस्तक्षेप घेत नाही आहे. नगर परिषदेने तात्काळ नगर विकास मंत्रालयाने नगर परिषद गडचांदुर अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here