चंद्रपूर जिल्हा पोलिस दल व एस आई एस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
703

चंद्रपूर जिल्हा पोलिस दल व एस आई एस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

चंद्रपूर, ८ ऑक्टो : चंद्रपूर जिल्हा पोलिस दल व एस आई एस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यातील पुरुष उमेदवारांची खाजगी सुरक्षा रक्षकांची रिक्त असलेल्या ३०० जागाकरिता जिल्ह्यात विविध ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

एस आय एस इंडिया लिमिटेड ही खाजगी सुरक्षा रक्षक पुरविणारी नामांकित कंपनी असून या कंपनीतर्फे महाराष्ट्र, छत्तीसगड, हैद्राबाद व तेलंगणा या राज्यातील सरकारी व खाजगी क्षेत्र तसेच बँक, एटीएम, हॉटेल, हॉस्पिटल, प्लांट, माईन्स, एयर पोर्ट, बंदरे, शिक्षण संस्था, पुरातत्व विभाग इत्यादी ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येते. सदर कंपनीतर्फे नियुक्त उमेदवारांना प्रति महिना १२ हजार ते १८ हजार रुपये वेतन, पिएफ, ग्रॅज्युईटी, बोनस, राहण्याची व्यवस्था तसेच त्यांच्या दोन अपत्यांना द इंडियन पब्लिक स्कुल देहरादून येथे शिक्षण सुविधा दिल्या जातात.

सदर मेळावा अनुक्रमे १५ तारखेला पोलीस स्टेशन गडचांदूर आवारात, १६ तारखेला पोलीस स्टेशन वरोरा आवारात, १७ तारखेला पोलीस स्टेशन चिमूर आवारात, १८ तारखेला पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी आवारात, १९ तारखेला पोलीस स्टेशन मुल आवारात, २० तारखेला पोलीस स्टेशन राजुरा आवारात तर २१ व २२ तारखेला पोलीस मंगल कार्यालय तुकूम चंद्रपूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आयोजित आहे.

सुरक्षा रक्षक पदाकरिता उमेदवार १० उत्तीर्ण असावा. वय २१ ते ३७ वर्ष, उंची १६७.५ सेमी, वजन ५६ किलो असावे. कंपनीकडून तीनशे पन्नास रुपये नोंदणी फी आकारण्यात येईल. पात्र उमेदवारांनी सोबत येताना शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो सह मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here