महाराष्ट्रातील कवयित्रिंचे आँनलाइन काव्य संमेलन, अनेकांचा सहभाग!

0
375

महाराष्ट्रातील कवयित्रिंचे आँनलाइन काव्य संमेलन, अनेकांचा सहभाग!

अमोल राऊत

भंडारा : कोवीड १९ च्या पार्श्वभूमिवर सुरू असलेल्या लाँकडाऊनच्या कालावधीत परिस्थितीवर मात करीत संपूर्ण महाराष्ट्रातील कवयित्रिंनी आँनलाइन एकत्र येवून नुकताच (आँनलाइन) काव्यवाचनाचा कार्यक्रम घेतला. दरम्यान या काव्य वाचन कार्यक्रमाला महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात व नवाेदित कवयिंत्रिचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. हे आँनलाइन काव्य संमेलन गुगल मिट या अँपच्या मदतीने घरूनच घेण्यात आले हाेते.

सदर आँनलाईन संमेलनाचे आयोजन विचार यश मासिक व पुरोगामी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तद्वतच सुपरिचीत साहित्यिका व भंडारा पुराेगामी पत्रकार संघाच्या महिला जिल्हाध्याक्षा अस्मिता मेश्राम, कल्पना एस. वाहूळे कवयित्रि तथा रमाई मासिक मुंबईच्या सहसंपादिका यांनी केले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उदगिर लातुरच्या साहित्यिका सुरेखाताई गुजलवार यांनी विभुषित केले हाेते. तर प्रमुख अतिथी म्हणून सुनंदा बोदिले (संपादिका मुक्तमंथन व कवयित्रि), अँ. प्रशांत सिरसाट (संपादक विचार यश मासिक) यांची उपस्थिती हाेती. उपरोक्त आयोजित कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेख रित्या अस्मिता मेश्राम (साहित्यिक भंडारा ) यांनी केले हाेते. कल्पना वाहूळे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.

उपरोक्त आँनलाइन काव्य संमेलनात मुंबई (परिसारातील कल्याण, उल्हासनगर, विरार) या शिवाय पुणे, बिड, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपुर, उस्मानाबाद, वाशिम, नांदेड, जळगाँव, भंडारा या जिल्ह्यातील अनेक नामवंत व मान्यवर कवयित्रिंनी सहभाग घेवून विविध विषयांवर कविता सादर केल्या.
आँनलाइन संमेलनाची विशेष व उल्लेखनिय बाब अशी की सदर काव्य संमेलनात सादर करण्यात आलेल्या कविंताचे शाँपिजन या साईडवर सामुहिक ई- काव्यसंग्रह “स्वातंत्र स्त्रीचे” याच शिर्षकाखाली तयार करण्यात आले आहे.

यशस्विरित्या पार पडलेल्या संमेलनात विद्याताई भोरजारे, शशिकलाताई गुंजाळ, प्रिया भोले, नलिनी प्रधान, शरयू पवार, कविता थोरात, कांचन मुन, कविता काळे, उमा लुकडे, शालिनी मांडवधरे, विद्या निसरगंध, पुष्पा बोरकर, अर्चना नळगीरकर, करूणा खांडेकर, संघमित्रा बाभरे, सरिता सातारडे, सुजाता साळवे, निर्मल काळबांडे, छाया दिक्षीत, सुरेखा कुलकर्णी, देवयानी आकोडे, सुनिता कुलकर्णी, हर्षदा चव्हान, मनिषा मेश्राम, अंजू वरठे, गंगा सपकाळे, पदमा घरडे आदि मान्यवर कवयिंत्रिनी भाग घेतला. एव्हढेच नाही तर आयाेजकांनी एक चांगला कार्यक्रम आयोजित केला. या बाबत त्यांनी आयाेजकांची ताेंड भरुन स्तुती केली. एकंदरीत सुरेख रित्या आँनलाईन काव्य वाचनाचा कार्यक्रम पार पडला व त्याला उत्तम प्रतिसाद देखिल मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here