गाव तसं चांगल मात्र “वादंग” ने पेरलं

0
422
  1. गाव तसं चांगल मात्र “वादंग” ने पेरलंU

त्या गावातील सरपंचच्या कारभाराला कंटाळून कुलुप लावण्यात आले

भीम आर्मी संविधान रक्षक जगदीश मेश्राम यांचे आरोप

 

चिमूर गावखेड्यांचा झपाट्याने विकास झाला पाहिजे या हेतूने शासनाने ग्रामपंचायतची निर्मिती केली या ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच व ग्रामसेवक यांच्या मदतीने पाहिला जातो परंतु पंचायत समिती चिमूर अंतर्गत येणाऱ्या महादवाडी येथील सरपंचांनी कळसच गाठलेला आहे. त्यामुळं गाव तसं चांगल मात्र वादंग ने पेरलं अस म्हणायला वावगं ठरणार नाही.

महादवाडी ग्राम पंचायत येथील चपराशी सिदार्थ रामटेके याना शासकीय दस्तावेज व आर्थिक घोळ केल्याच्या चुकीच्या कारणांमुळे त्यांना कामावरून कमी करण्यात आले त्याच प्रमाणे गोपीचंद गोंगले नामक व्यक्तीला मंजूर घरकुलाचे बांधकाम थांबविने असे चुकीचे प्रकार केल्यामुळे अन्याग्रस्त नागरिकांना उचित न्याय मिळावा या करिता महादवाडी येथे गेलो असता सरपंच आणि सचिवांना फोन वर सांगितले असता ते हजर न होता वेळोवेळी वेळकाढू धोरण अवलंबनमुळे अन्याग्रस्त नागरिकाचा रोष पाहुन ग्राम पंचायत ला कुलूप लावण्यात आले, यात त्या गावातील सरपंच भोजराज कामडीच्या कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतला कुलूप लावण्यात आले. असल्याचे मत भीम आर्मी सेना अध्यक्ष जगदिश मेश्राम यांनी सांगितले आहे.

मी कुठल्याही महिलांना खोटे बोलून आणले नसून महिला स्वतः उपस्थित होत्या मात्र महादवाडी येथील सरपंच भोजराज कामडी यांच्या मनमानी कारभारला वेळीच आवर घाला अन्यथा भीमआर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. वेळे प्रसंगांना मुख्यमंत्री जिल्हाधिकारी पोलीस स्टेशन उपविभागीय कार्यालय या कार्यालयावर सुद्धा न्याय मागण्यांसाठी जाण्याची तयारी असल्याचे अध्यक्ष जगदीश मेश्राम यांनी दिले आहे.

महादवाडी येथील ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धार्थ रामटेके याला कामावर रुजू करून घ्या असे गटविकास अधिकाऱ्याचे पत्र असताना ग्रामपंचायत महादवाडी येथील सरपंच हा वैयक्तिक राग काढून आणि खोटे कारणे दस्तावेज देऊन त्या कर्मचाऱ्याला रुजू करून घेण्यास नकार दिला जात आहे. चुकीचे कारणे देऊन मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली. सुनावणी होऊन तब्बल सोळा दिवस झाले मात्र अजूनही कुठलाही निर्णय आलेला नाही आम्हला प्रशासनाच्या वतीने कुठलाही निर्णय दिलेला नाही.

गोंगले नामक व्यक्तीला चुकीचे कारणे देऊन घरकुलाचा निधी थांबवत असून सरपंच करत असलेले कृत्य हे बेकायदेशीर आणि फक्त दोन कुटुंबातील सदस्यला हा त्रास देण्याचा प्रकार करीत आहे त्याच्यामुळे हेकेखोर आणि सरपंचाला अपात्रतेची कार्यवाही करण्यात यावी.अन्यथा भीम आर्मी सेना उग्ररूप आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा इशारा सुध्दा यावेळी देण्यात आलेला आहे.

सुनावणी आणि बैठकीमध्ये झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला दोन टप्यात मानधन ग्रामपंचायतला देणे असे ठरले असताना असा आदेश हे पारित झाले असताना गावातील सरपंच मात्र मानधन न देता पाणीपुरवठ्याच्या निधी मधील साठ हजार रूपये काढून खर्च करतो मात्र ज्या कर्मचाऱ्यांनी एवढा आटापिटा केला त्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी हा एकही रुपया त्या कर्मचाऱ्याला पगाराला दिलेलं नाही अशा सरपंचच्या वागण्यामुळे अख्या तालुक्यामध्ये या महादवाडी गावचं वादंग चर्चेला जात असून समोर येत आहे तेव्हा वेळीच या सरपंचाला पदावरून तत्काळ पायउतार करण्यात यावे अशीही मागणी गावकऱ्यांच्या वतीने होत आहे, त्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने वेळीच महादवाडी या गावावर अंकुश लावून त्याची चौकशी करावी अशी मागणी भीम आर्मी संविधान रक्षक जगदीश मेश्राम, सिद्धार्थ रामटेके यांचा मुलगा रोहित रामटेके यांनी केली आहे.

 

या पूर्वी सदर चपराशी यांना पंधरा हजार रु चेक देण्यासाठी गेले असता चपराशी यांनी घेण्यास नकार दिला ,ग्राम पंचायत मधील साठ हजार रु ग्राम पंचायत च्या पाणी व इतर कामावर खर्च करण्यात आले.

भोजराज कामडी
सरपंच महादवाडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here