शेत शिवारावर नरभक्षी वाघाची भ्रमंती, ‘त्या’ वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाकडून होतोय विलंब

0
521

शेत शिवारावर नरभक्षी वाघाची भ्रमंती, ‘त्या’ वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाकडून होतोय विलंब

वनविभाग अजूनही झोपेत आहे काय? परिसरातील शेतकरी व शेतमजुरांचा संतप्त सवाल

राजु झाडे

राजुरा तालुक्यातील कविटपेठ, धानोरा, चिंचोली(बु.), विरुर(स्टे) परिसरात मागील पाच सहा महिन्यापासून वाघाची दहशत सुरू आहे. आजही हा नरभक्षी वाघ कविटपेठ व धानोरा मधील आर्वी फाट्यावरील शेत शिवारावर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास खुली भ्रमंती करताना आढळून आला असून आज सुद्धा कसे बसे एक शेतकाऱ्यांचे प्राण वाचले. नरभक्षी वाघाच्या शेतशिवरातील भ्रमंतीमुळे शेतीची कामे रखडली असून शेतकरी चिंतेत आहे.

कविटपेठ येथील शेतकरी आपले शेतातील कामे आटपून घराकडे बैल घेऊन येत असताना त्यांना शेतशिवारालगत वाघ फिरताना दिसला. वाघ त्याच्यावर हल्ला करणार कळताच शेतकऱ्यानी झाडावर चढून स्वतःचा जीव वाचविला. ही घटना आज 5 वाजता घडली. याची वनविभागाला माहिती दिला असता वन विभागाची चमू घटनास्थळी 8 वाजेच्या सुमारास दाखल झाले.

मागील 5, 6 महिन्यात या नरभक्षी वाघाने 8 लोकांचा बळी घेतला आहे. त्याचे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. या वाघाला जेरबंद करण्याबाबत मागील 2 महिन्यापासून वनविभाकडे निवेदने सादर करून सुध्दा कोणत्याही प्रकारे कारवाही करण्यात आली नाही आहे. तसेच माजि आमदार मा. सुदर्शन निमकर याच्या द्वारे सुद्धा निवेदन पाठवण्यात आले असून वनविभाकडून कोणतीही कारवाही करण्यात आली नाही. आणखी पुन्हा किती शेतकरी या नरभक्षी वाघाला बळी पडण्याची वनविभाग वाट पाहत आहे. वनविभाकडे माणसाच्या प्राणाची काही किंमतच उरलेली नाही का? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.
परिसरातील सर्व लोकांकडे शेती शिवाय दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन नाही आणि अशातच या वाघाच्या दहशती मुळे लोकांना शेतमालाचे संगोपन करणे कठीण होऊन जीवाची भीती निर्माण झाली आहे.

वनविभाग वाघाला जेरबंद करण्याच्या मागणी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का? वनविभाग शेकऱ्यांच्या जीवावर उठले आहे का? असा प्रश्न स्थानिक जनतेच्या निर्माण झाला आहे. सदर नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाकडून विलंब होत आहे. सदर बाबीची तातडीने दखल घेऊन सदर वाघास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here