चीचबोडी येथे वैज्ञानिक पद्धतीने फळझाड लागवड ; कृषिक विद्यार्थ्याचा अभिनव उपक्रम
आज दि. 26 जून 2020 रोजी चिचबोडी येथील प्रकाश ताजने यांच्या शेत बांधावर जाऊन वैज्ञानिक पद्धतीने सीताफळ पिकाची लागवड करण्यात आली.
या उपक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सलग्णीत श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय येथे चतुर्थ वर्षाला शिकत असलेला विद्यार्थी कु. मयुर बंडुजी मोहूर्ले याने ग्रामीण कृषि कार्यानुभव या अभासक्रमांतर्गत शेतकऱ्यांना आंतरपीक व फळझाड लागवड करून याचे महत्व समजावून सांगितले.
या उपक्रमाला कृषी पर्यवेक्षक श्री संदीप दातारकर यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
