सुकनेगाव ते गोडगाव रस्त्याची दुरावस्था

0
849

सुकनेगाव ते गोडगाव रस्त्याची दुरावस्था

 

 

वणी (यवतमाळ) मनोज नवले 
यवतमाळ जिल्ह्याचे वणी तालुक्यातील सुकनेगाव ते गोडगाव रस्त्याची दुरावस्था. सुकनेगाव ते गोडगाव असा चार किलोमीटरचा रस्ता आहे. तरीपन स्वांतञ्याच्या सत्तर वर्षा नंतरही रस्ता मरणयातना भोगत आहे.

 

 

या रस्त्याची निर्मीती 1975 ते 1980 च्या दरम्यानची आहे तेव्हापासुन कधी या रस्त्याचे खडीकरण किंवा डांबरीकरण झाले नाही रस्ता तयार झाला तेव्हापासुन अनेक निवडणुका झाल्या अनेक़ लोकप्रतिनीधी निवडुन गेले लोकप्रतिनीधी फक्त गावात निवडणुकीच्या प्रचारासाठी गावात येतात तेव्हा त्यांना गावातील नागरिक रस्त्याविषयी माहीती विचारतात तर ते सांगतात कि हो रस्ता होणार आहे होईल त्यानंतर अनेक वर्ष लोटुन जातात आणि पुन्हा विचारल्यास तेच उत्तर राहतात पण रस्ता होत नाही. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधील सदस्य सुद्धा याच मार्गावरील आहे पण कोणीही या रस्ताकडे लक्ष द्यायला तयार नाही असे तेथील परिसरातील नागरिकांनी सांगितले यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक आहे.

 

 

वणी हे ठिकाण सुकनेगाव या मार्गाने गेल्यास अठरा किलोमीटर तर कायर या मार्गाने गेल्यास सत्ताविस किलोमीटर पडतात आणि सुकनेगाव ते गोडगाव मार्ग तयार झाल्यास अनेकांचा फेरा कमी होईल. याचा सर्वाधिक फटका शाळा महाविद्यालयातील विद्यार्थांना बसत आहे तरी आमदार साहेब व खासदार साहेब आम्हा गोडगाव वासियांकडे लक्ष द्यावे असे बोलल्या जात आहे. व कामानिमित्य जाणार्या नागरिकांना याचा फायदा होईल विशेष म्हणजे याच मार्गावर पुरातन भवानी माता मंदीर आहे तरी या मंदीरात येणार्यांना सुद्धा या मार्गाचा फायदा होईल असे गावातील नागरिकांमधून सूर बघायला मिळत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here