कुडेसावली येथील ग्रामस्थांची आदर्श गावाकडे वाटचाल

0
759

कुडेसावली येथील ग्रामस्थांची आदर्श गावाकडे वाटचाल

कुडेसावली गाव आदर्श करण्याचा महिलांचा निर्धार

 

राज जुनघरे

बल्लारपूर :- कुडेसावली येथे आज दिनांक 17 सप्टेंबर 2021 ला सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य च्या वतीने मा. बाबासाहेब पावसे पाटील , राज्य सरचिटणीस यांचे नेतृत्वात स्मार्ट ग्राम बनविण्यासाठी सृक्ष लागवड आणि गावसहभगी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दर महिन्याला एकदा गाव स्वच्छ करण्याचा निर्धार महिलांनी केला असून गाव हागणदारी मुक्त , व्यसन मुक्त , शिक्षण व आरोग्य , वृक्ष लागवड करणे , गावाचे सौंदर्यीकरण , प्लास्टिक बंदी , शोषखड्डा , पाणी आडवा पाणी जिरवा , गाव स्वच्छता आणि जेविक शेती इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. सोशल डिस्तांसिंनग ठेवून मा. मारोती पांडुरंग मडावी सरपंच ग्रा. प. कुडेसावली , मा. राजेश्वर डोडीवार , उपसरपंच सौ. ताईबाई आनंदराव चीलनकर अध्यक्ष आदर्श गाव विकास समिती, सौ. अरुणा शंकर झाडे सचिव गाव विकास समिती , सौ. अनिता विनायक लोडे , सौ. आशा मंगलदास दुधकोर , सौ. मनोरंजना बाबा मडावी , सौ. उज्वला संतोष चामलाटे CRP , सौ. उषा मोरेश्वर मोरे , सौ. ज्योती परमेश्र्वर घुमे , सौ . तारा विजय सुर , सौ. अर्चना मारोती राऊत , सौ. मनीषा ज्ञानेश्वर मडावी , सौ . अनिता बालाजी नैताम , सौ. अरुणा रामटेके , संतोष चामलाटे ग्रां. प. शिपाई , तसेच क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले महीला ग्रामसंघाच्या सदस्या व महीला बचत गटाच्या अध्यक्षा व सदस्या मा. जगदीश पाचभाई , राज्य समन्वयक, सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य आणि सर्व बचत गटाच्या महिलानी सहभाग घेतला असून माझे गाव माझी जबाबदारी नुसार जंगल भागातील मागासवर्गीय क्षेत्रातील कुडेसावली गाव आदर्श करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी मा. सरपंच साहेब म्हणाले की सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून गावात स्मार्ट ग्राम चा प्रकल्प राबविण्यात येत असून याप्रकारे असेच ग्रामस्थांनी सहकार्य केले तर गावाला लवकरच स्मार्ट ग्राम चा दर्जा मिळेल. यासाठी जेवढ्या कामाची उणीव आहे ती लोक सहकार्याने भरून काढू. आणि गावाला आदर्श बनविण्यासाठी कार्यरत राहु. असे म्हंटले आहे. त्याचप्रमाणे सौ. ताईबाई चिलनकर अध्यक्ष यांनी सुध्दा गाव विकासाबाबत मार्गदर्शन केले असून येत्या दोन वर्षांत आपले गाव सुंदर व स्वच्छ राहील त्यासाठी लोकामध्ये जागृती घडवून आणू. असे म्हंटले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here