फकरू कुळसंगे यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

0
555

फकरू कुळसंगे यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड

राजुरा (येरगव्हान) : तालुक्यातील येरगव्हान येथे १६ सप्टेंबरला पार पडलेल्या ग्रामसभेत फकरू रामचंद्र कुळसंगे यांची बिनविरोध सलग तिसऱ्यांदा तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. हि ग्रामसभा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

२०१९ पासून कुळसंगे येरगव्हान तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांचे स्थानिक वाद-तंटे निपटारा करण्याचे कार्य उल्लेखनीय असून मनमिळाऊ स्वभाव व निर्णयातील सचोटी यामुळे त्यांची परत यावर्षी बिनविरोध निवड करत त्यांची सर्वानुमते सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदी वर्णी लागली. बालाजी दुर्गे, मेघराज भगवे, जयंत रामटेके, मुजित शेख, कोटरंगे यांची तमुस सदस्य पदी निवड करण्यात आली. यावेळी गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here