घोडदरा शिवारात आढळला युवकाचा संशयास्पद मृतदेह, घात पात असल्याची चर्चा

0
775

घोडदरा शिवारात आढळला युवकाचा संशयास्पद मृतदेह, घात पात असल्याची चर्चा

मनोज नवले, वणी:- पोलिस स्टेशन मारेगाव च्या हद्दीत येत असलेल्या तालुक्यातील घोडदरा शेत शिवारात एका युवकाचा संशयीत रित्या मृत्युदेह आढळल्याचे आज 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे.प्रमोद रामपुरे (22) रा.अर्जुनी असे मृतकाचे नाव आहे.

 

 

तालुक्यातील घोडदरा शेत शिवारातील गजानन धनवे यांच्या शेतात अर्जुनी येथील प्रमोद रामपुरे (22)या युवकाचा संशयीत रित्या म्रुतदेह आढळुन आला. हा म्रुतदेह जवळपास बऱ्यांच वेळा पासुन धनवे यांच्या शेतातील पर्हाटी मध्ये पडुन होता. शेतातील संशयित म्रुतदेहाचे पॅट कमरे खाली उतरलेल्या अवस्थेत दिसुन येत आहे.तर तोंडाला फेस आल्याचे दिसून येत आहे.तो एका पोडावरुन शेतातुन जातानाच्या पाऊल खुणा चिखलामुळे स्पष्ट दिसत होत्या हा म्रुत्यु नेमका कशामुळे झाला याचा उलगडा झाला नसला तरी मात्र याबाबत तर्क वितर्काना उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here