लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीतून अन्यायाविरुद्ध लढा उभारला – माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0
488

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या लेखणीतून अन्यायाविरुद्ध लढा उभारला – माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

हिंगणघाट येथे मातंग समाज बांधवांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन.

हिंगणघाट वर्धा:- अनंता वायसे तालुका प्रतिनिधी

हिंगणघाट शहरातील गोल बाजार येथे साहित्यरत्न, लोकशाहीर,समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती निमित्त मातंग समाजाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त अण्णाभाऊ साठे व महापुरुषांच्या फोटोला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा.राजू तिमांडे व नगरसेवक सौरभ तिमांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयंतीनिमित्त आयोजक कमिटीच्या वतीने अल्पहार वाटप करून, ढोल ताशाच्या गजरात समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे म्हणाले की, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरी काव्यातून शोषित,पीडित,शेतकरी,कष्टकरी व कामगार यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत अन्याय विरोधी लढा उभारला त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले.
त्यावेळी मातंग समाज आयोजन कमिटीचे संगेश ससाने, कृष्णा गायकवाड, रोहित गवळी ,आकाश बावणे, वैभव पवार, सचिन बावणे ,पवन झोंबाडे, मंगेश ससाने, गोलू डोंगरे, प्रशांत डोंगरे ,सुभाष उमरे, मनीष बावनकर ,संजय धनरेल, सागर खंडाळकर ,गजू मुंगले, भीमा मुंगले, मंगेश पोटफोडे, केशव डोंगरे ,पांडू मुगले ,नानाजी मुंगले, विठ्ठल डोंगरे, पवन डोंगरे, ईशांत खंदार ,कुंडलिक तेलंग, बंडूजी डोंगरे, नानाजी बावणे, आकाश बावणे, नितीन काळे, राजू खडसे ,दीपक बावणे, अजय तेलंग तसेच मातंग समाज बांधव आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here