ग्राम संवाद सरपंच संघ प्रदेश कार्यकारिणीची सभा औरंगाबाद येथे संपन्न

0
907

ग्राम संवाद सरपंच संघ प्रदेश कार्यकारिणीची सभा औरंगाबाद येथे संपन्न

प्रत्येक गावाचा विकास करुन गावाला आदर्श व सक्षम बनविण्याचा केला संकल्प

impact24news network
ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य आज दिनांक 18 जुलै रोजी औरंगाबाद मुख्य कार्यालय येथे प्रदेश कार्यकारणी व जिल्हाध्यक्ष यांची सरपंच आणि ग्रामविकास यावर चर्चा व प्रदेश कार्यकारणी ची सभा महाराष्ट्र ग्रामसभा सरपंच संघ चे अध्यक्ष आजिनाथ धामणे पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.

सदर सभेत उपाध्यक्ष प्रमोद भगत सचिव विशाल लांडगे पाटील प्रवक्ता भाऊसाहेब काळे पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख किरण घोंगडे किरण संघटक शिवशंकर काळे सर्व प्रदेश कार्यकारणी सदस्य व महाराष्ट्रातील ग्रामसभा सरपंच संघ परभणी ते गडचिरोली सर्व जिल्हाध्यक्ष, विदर्भ अध्यक्ष दिगंबर धानोरकर, विदर्भ सरचिटणीस निलेश फुलकामकर व सर्व विभाग प्रमुख आणि राज्यातील प्रमुख सरपंच उपस्थित होते. आज ग्रामसभा सरपंच संघ 1 मे 2019 रोजी ऑनलाइन झूम मीटिंग द्वारे सभा घेऊन स्थापन करण्यात आले होते. आज प्रत्यक्ष प्रदेश कार्यकारणी चे 40 सदस्य व स्वस्तिक जिल्हाध्यक्ष यांचे उपस्थितीत सभा पार पडली. सदर सभेत प्रामुख्याने खालील विषय घेण्यात आले.

 

राज्यातील ग्रामपंचायत स्टेट लाईटचे विजबिल शासनाने भरावे. सरपंच यांना योद्धा घोषित करून 50 लाखाचा विमा कवच व सरपंच पदावर कार्यरत असताना नैसर्गिक व अपघात झाल्यास सरपंच यांना विमा कवच देण्यात यावा.

 

सरपंच हे लोकनियुक्त लोकसेवक असून शासकीय काम करीत असताना कुणी हल्ला केला तर संबंधित व्यक्तीवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे.या कलमाखाली गुन्हा दाखल करणे व सरपंच यांना 353 कलम आजचे संरक्षण मिळावे. पंचवीस पंधरा जनसुविधा निधी थेट ग्रामपंचायतला देण्यात यावा. राज्यात पन्नास टक्के महिला सरपंच असल्याने शासकीय कामाकरता तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या सरपंच महिला सरपंच यांना तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय स्वतंत्र महिला कक्ष उभारण्यात यावे. सहा जिल्हा परिषद सदस्य व नगर सेवक प्रमाणे सरपंच यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद मतदार संघात मतदानाचा अधिकार देऊन सरपंचाचा प्रतिनिधी आमदार म्हणून निवडण्यात यावा. ग्रामसभा सरपंच संघ महाराष्ट्र राज्य नोंदणी क्रमांक 316 अभिलेख 2021 व राज्यातील सरपंच मिळून 100% गाव विकास करण्यात यावा. त्यासाठी सुक्ष्म निरीक्षण करून तरूण गावाचे विकासाचे मॉडेल प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अकरा गाव दत्तक घेऊन 35 जिल्ह्यात तीनशे गाव साडेतीनशे शेती विषय मागे पुढे येत नाही का साडेतीनशे गावांचा विकास करून आदर्श गाव निर्माण करण्याचा संकल्प करण्यात आला. सदर सभेचे संचालन विदर्भ सरचिटणीस निलेश फुलकर पुलगमकर सरपंच हिवरा तालुका गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव विशाल पाटील लांडगे तर संघटनेचे महत्व व संघटनेची पुढील दिशा असेल यावर सविस्तर मार्गदर्शन ग्रामसभा सरपंच संघाचे उपाध्यक्ष प्रमोद भगत यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांनी आपले मत मांडले तर सरपंच मंडळी यांनी आपल्या समस्या मांडल्या. माननीय अध्यक्ष महोदय यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एक गाव आदर्श निर्माण करून अण्णा हजारे पोपटराव पवार भास्कर पेरे पाटील देशात राज्यात नावलौकिक प्राप्त करतात तर आपण ग्रामसंवाद सरपंच संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात अकरा गाव आदर्श तयार केले तर आपली खरी राष्ट्र सेवा होईल. आणि प्रत्येक गाव सक्षम होईल आणि तेच उद्देश घेऊन संघटना काम करणार आहे. या संघटनेच्या माध्यमातून गावाचा विकास करणार आहे. असे प्रतिपादन आजिनाथ धामणे पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रामसभा सरपंच संघ औरंगाबाद जिल्हाध्यक्ष समाधान गायकवाड यांनी केले कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातील ग्रामसभा सरपंच संघाचे पदाधिकारी उपस्थित राहिल्याने त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here