गडचांदूर येथे विद्युत विभागाची आढावा बैठक आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

0
345

गडचांदूर येथे विद्युत विभागाची आढावा बैठक आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

गडचांदूर:- गडचांदूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ची आढावा बैठक आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. बैठकीला विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता श्री तेलंग साहेब, उप विभागीय अभियंता श्री इंदुरकर साहेब, कनिष्ठ अभियंता श्री राऊत, श्री शेंडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.
गडचांदूर येथील विद्युत मंडळाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्रमांक 1 व 2 येथील ओवरहेड तारांचा विषय, विद्यानगरी व प्रभाग ७ व इतर प्रभागातील सिंगल फेस थ्री फेस मध्ये रूपांतरण, विविध ओपन स्पेस वर असलेले ट्रांसफार्मर हलवण्याबाबत,मुख्य बाजारपेठेतील व अचानक चौकातील  रस्त्यावर आलेले विद्युत खांबाचे स्थानांतरण, शेतकऱ्यांना कनेक्शन, रेल्वे लाईनच्या पलिकडील क्षेत्रातील लोकांना ग्रामीण क्षेत्रातून होत असलेला पुरवठा शहरी भागातून देण्याबाबत विषय नागरिकांनी उपस्थित केले.सर्वच विषयांवर त्वरित कारवाई करण्याबाबत निर्देश आमदार सुभाष धोटे यांनी संबंधित विभागाला दिले.
नगराध्यक्ष सौ सविता टेकाम यांनी रोजच्या विजेच्या लपंडाव बाबत प्रश्न उपस्थित केला. या बाबत  सब स्टेशन येथे ४ ब्रेकर चे काम सुरू असून १ चे झालेले आहे, ३ ब्रेकर चे काम कोरोना मुळे उशिरा होत आहे असे उपविभागीय अभियंता इंदुरकर यांनी स्पष्ट केले. बांधकाम सभापती विक्रम येरणे यांनी गडचांदूर पाणीपुरवठा योजने च्या अमल नाला  येथील इनटेक वेल ला अनियमित विद्युत पुरवठा आणि त्यामुळे निर्माण झालेली पाण्याबाबत समस्ये बाबत तक्रार उपस्थित केली.  बिबी येथील ४० वाढीव पोल चा विषय उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांना मांडला. यावर सदर काम त्वरित करण्याचे निर्देश आमदार धोटेंनी दिले. ग्रामीण क्षेत्रातील विविध समस्या अरूनभाऊ निमजे, शैलेश लोखंडे, अभय मुनोत यांनी मांडल्या. ग्रामीण क्षेत्रातील समस्ये साठी वेगळी बैठक घेण्याची सूचना अा. धोटेनी केली.
राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर आलेले विद्युत पोल चे स्थानांतरण लवकरच महामार्ग प्राधिकरण तर्फे करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले.
आढावा बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस चे विधान सभा प्रमुख अरुण भाऊ नीमजे, नगराध्यक्षा सौ सविता टेकाम, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष हंसराज चौधरी, उपसरपंच आशिष देरकर, गटनेता विक्रम येरणे, सभापती जयश्री ताकसांडे,स्विकृत सदस्य पापय्या पोंनमवार, बाबा गोरे,काँग्रेस चे नव नियुक्त अध्यक्ष संतोष महाडोडे नगरसेवक राहुल उमरे,अरविंद मेश्राम, अर्चना वांढरे, युवक काँग्रेस चे जिल्हा महासचिव शैलेश लोखंडे, नांदा चे ग्रामपंचायत सदस्य अभय मुनोत, प्रवीण झाडे, माजी उपसरपंच बाबाराव पुरके, माजी ग्रा. प. सदस्य अहेमद भाई, बळीराम ताडे,मेश्राम, अनिल निवलकर, आशिष वांढरे, राहुल ताकसांडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here